ETV Bharat / technology

व्होडाफोन आयडियासोबत नोकियाची मोठी डील, 4G आणि 5G बाबत करार - Vodafone Idea 4G and 5G deal

Vodafone Idea 4G and 5G deal : Vodafone Idea Limited (VIL) नं देशातील 4G तसंच 5G नेटवर्क मजबूत करण्यासाठी नोकियासोबत करार केला आहे. शनिवारी नोकियानं सांगितलं की, दोन्ही कंपन्यांमध्ये तीन वर्षांचा करार झाला आहे.

Nokia
नोकिया (ANI)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 30, 2024, 11:17 AM IST

हैदराबाद Vodafone Idea 4G and 5G deal : मोबाईल कंपनी नोकिया 4G आणि 5G नेटवर्कला बळकट करण्यासाठी आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या भारतातील आघाडीच्या दूरसंचार कंपनी Vi ला मदत करणार आहे. देशातील 4G आणि 5G नेटवर्क मजबूत करण्यासाठी Vodafone Idea Limited (VIL) नं नोकियासोबत करार केला आहे. शनिवारी नोकियानं सांगितले की, दोन्ही कंपन्यांमध्ये तीन वर्षांचा करार झाला आहे.

5G नेटवर्क सुरू करणार : Nokia आणि Vodafone Idea एकत्रितपणे देशातील प्रमुख शहरांमध्ये 5G नेटवर्क सुरू करणार आहेत. जे VIL ग्राहकांना प्रीमियम कनेक्टिव्हिटी देखील प्रदान करेल. VIL चे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय मुंद्रा म्हणाले, "5G ची हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी नागरिक आणि उद्योगांसाठी उपयुक्त ठरेल. 5G च्या हाय-स्पीड कनेक्टिव्हिटीसाठी आम्ही आमच्या भागीदारांसोबत एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत."

नेटवर्क उपकरणांसाठी $3.6 अब्ज करार : त्याच वेळी, नोकियानं सांगितलं की, ते VIL चे विद्यमान 4G नेटवर्क मल्टीबँड रेडिओ तसंच बेसबँड उपकरणं अद्यतनित करेल. त्यानंतर ते 5G चं समर्थन करण्यास देखील सक्षम असेल.Vodafone Idea नं तीन वर्षांच्या कालावधीत नेटवर्क उपकरणांच्या पुरवठ्यासाठी नोकिया, एरिक्सन तसंच सॅमसंगसोबत सुमारे $3.6 बिलियन (सुमारे 30,000 कोटी रुपये) किमतीचा करार केला आहे. कंपनीनं यापूर्वी $6.6 अब्ज भांडवली खर्चाची घोषणा केली होती. कंपनीनं म्हटलं आहे की, प्रमुख शहरांमध्ये 5G लाँच केल्यामुळं लोकसंख्येच्या आधारावर 4G ची व्याप्ती 1.03 अब्ज वरून 1.2 अब्ज पर्यंत वाढवायची आहे.

हे वाचलंत का :

  1. राज्यातील महिलांना तीन सिलेंडर मिळणार मोफत; पात्रता, अर्ज कसा करावा? जाणून घ्या सर्वकाही - Mukhyamantri Annapurna Yojana
  2. AB PM JAY योजनेत नागरिकांवर मोफत उपचार, 'असा' करा ऑनलाइन अर्ज - AB PM JAY Yojana
  3. ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह Samsung Galaxy S24 EF लाँच, जाणून घ्या खास फिचर - SAMSUNG GALAXY S24 EF LAUNCHED

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.