महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

अभियंता दिन 2024: काय आहे इतिहास, का साजरा केला जातो हा दिवस? मैदान गाजवणाऱ्या 'या' खेळाडूंनी घेतली अभियांत्रिकीची पदवी - Engineers Day 2024 - ENGINEERS DAY 2024

Engineer's Day 2024 : दरवर्षी भारतात 15 सप्टेंबर हा अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. आजघडीला अनेक क्षेत्रात आपल्या अभियंता दिसतात. भारतातच नव्हे तर जगातील इतर देशांमध्येही अभियंता दिन साजरा केला जातो.

Engineers Day 2024
अभियंता दिन 2024 (ETV Bharat Graphics)

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 15, 2024, 12:02 AM IST

Updated : Sep 15, 2024, 7:38 AM IST

नवी दिल्ली Engineer's Day 2024 : भारतात दरवर्षी 15 सप्टेंबर हा अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताचे महान अभियंता आणि भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा वाढदिवस आहे. ते भारतातील महान अभियंत्यांपैकी एक होते.

काय आहे या दिवसाचा इतिहास : आधुनिक म्हैसूर राज्याचे जनक म्हटल्या जाणाऱ्या मोक्षगुंडम विश्वेश्वरैया आधुनिक भारताची निर्मिती केली आणि देशाला नवे रुप दिलं. त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात असाधारण योगदान दिलं आहे. जे कोणीही विसरु शकत नाही. देशभरात बांधलेल्या अनेक नद्यांची धरणं आणि पूल यशस्वी करण्यात विश्वेश्वरय्या यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्यामुळं देशातील पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला. 1968 मध्ये डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मतारखेला भारत सरकारनं 'अभियंता दिन' म्हणून घोषित केलं. तेव्हापासून दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी अभियंता दिन साजरा केला जातो.

अभियंता दिन केवळ भारतातच नव्हे तर इतर अनेक देशांमध्येही होतो साजरा : अभियंता दिन भारतातच नव्हे तर जगातील इतर देशांमध्येही साजरा केला जातो. जसं अर्जेंटिनामध्ये 16 जून रोजी, इटलीमध्ये 15 जून, बांगलादेशात 7 मे, तुर्कीमध्ये 5 डिसेंबर, इराणमध्ये 24 फेब्रुवारीला, बेल्जियममध्ये 20 मार्चला आणि 14 सप्टेंबरला रोमानियामध्ये अभियंता दिन म्हणून जातो. वास्तविक, हा दिवस जगभरातील अभियंत्यांना प्रोत्साहित करण्यासाठी साजरा केला जातो, जेणेकरुन ते त्यांच्या कौशल्यांमुळं देश आणि जगाला प्रगतीच्या नवीन मार्गावर नेतील.

  • क्रीडा विश्वात विशेषकरुन क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी अभियांत्रीकी क्षेत्रात पदवी मिळवली आहे. असे कोणते खेळाडू आहेत, वाचा सविस्तर...

श्रीनिवास वेंकटराघवन : भारतीय क्रिकेट संघाचे माजी ऑफब्रेक गोलंदाज श्रीनिवासराघवन वेंकटराघवन हे पंच आहेत. चेन्नईतील गिंडी येथील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून त्यांनी अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली.

श्रीनिवास वेंकटराघवन (Getty Images)

ईएएस प्रसन्ना : भारताचे माजी ऑफ-स्पिनर ईएएस प्रसन्ना हे क्रिकेटपटू बनलेला पहिले अभियंता असल्याचं म्हटलं जातं. त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, म्हैसूरु इथून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे.

ईएएस प्रसन्ना (Getty Images)

के श्रीकांत :80 च्या दशकाच्या मध्यात भारताचा आक्रमक सलामीवीर कृष्णमाचारी श्रीकांतनं चेन्नईतील गिंडी येथील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे.

कृष्णमाचारी श्रीकांत (Getty Images)

अनिल कुंबळे : महान भारतीय लेग-स्पिनर आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे देखील अभियांत्रिकी पदवीधर आहेत. त्यांनी राष्ट्रीय विद्यालय कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी पूर्ण केली.

अनिल कुंबळे (Getty Images)

जवागल श्रीनाथ : आयसीसी क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात भारताचा संयुक्त सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू, जवागल श्रीनाथनं म्हैसूरमधील श्री जयचामराजेंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (SJCE) मधून इंस्ट्रुमेंटल टेक्नॉलॉजीमध्ये अभियांत्रिकी पदवी पूर्ण केली.

जवागल श्रीनाथ (Getty Images)

रविचंद्रन अश्विन : भारतीय क्रिकेटचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनकडे माहिती तंत्रज्ञान विषयात बी.टेक पदवी आहे.

रविचंद्रन अश्विन (Getty Images)

शिखा पांडे : भारतीय महिला क्रिकेटर शिखा पांडे ही भारताच्या महिला क्रिकेटमधील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. 35 वर्षीय खेळाडूनं 100 हून अधिक सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. शिखा पांडेनं गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये बॅचलरची पदवी घेतली आहे आणि सध्या ती भारतीय हवाई दलातही कार्यरत आहे.

शिखा पांडे (Getty Images)

आकाश मधवाल : आकाश मधवाल आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी प्रमुख गोलंदाज होता. त्यानं 2016 मध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रुरकीमधून सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी घेतली.

आकाश मधवाल (Getty Images)

हेही वाचा :

  1. मैदानासोबत तुरुंगाची हवा खाणारे जगातील दिग्गज क्रिकेटपटू; 2011 च्या भारतीय विश्वविजेत्या संघातील दिग्गज खेळाडूचा समावेश - Cricketers Went to Jail
Last Updated : Sep 15, 2024, 7:38 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details