कोलकाता New Captain of LSG : आगामी 21 मार्चपासून IPL 2025 आयोजित केलं जाईल. स्पर्धा सुरु होण्यापूर्वी, सर्व संघ हळूहळू त्यांच्या कर्णधारांची नावं जाहीर करत आहेत. काही दिवसांपूर्वी पंजाब किंग्ज संघानं श्रेयस अय्यरला आपला कर्णधार बनवलं. दरम्यान, आता लखनऊ सुपर जायंट्स संघानंही आपला कर्णधार जाहीर केला आहे. ऋषभ पंत संघाचा नवा कर्णधार असेल. येत्या हंगामात तो एलएसजी संघाचं नेतृत्व करेल. लखनऊ सुपर जायंट्सनं त्याला लिलावात 27 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात महागडी बोली होती. ऋषभ पंतनं यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचंही नेतृत्व केलं होतं.
🚨 RISHABH PANT - THE NEW CAPTAIN OF LUCKNOW SUPERGIANTS 🚨 pic.twitter.com/KC8zdlOC8L
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 20, 2025
Sanjeev Goenka said - " i'm very clear that i want rishabh pant in lsg team at any cost. let anyone say whatever they want to say. i knew that no one would bid as much as i would for rishabh pant". pic.twitter.com/kjHLLyInLq
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 20, 2025
राहुल होता मागील कर्णधार : लखनऊ सुपर जायंट्स संघ आयपीएल 2022 पासून खेळत आहे. 2022, 2023 आणि 2024 मध्ये, लखनऊ सुपर जायंट्सचं नेतृत्व केएल राहुलनं केलं होतं. त्यांच्या नेतृत्वाखाली संघ 2022 आणि 2023 मध्ये प्लेऑफसाठी पात्र ठरला, परंतु 2024 मध्ये त्यांचा संघ तसं करु शकला नाही. मेगा लिलावापूर्वी लखनऊनं केएल राहुलला रिटेनही केलं नव्हतं. केएल राहुल पुढील हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना दिसेल. यावेळी लखनऊ संघ नवीन आशा घेऊन येत आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना त्यांच्या नवीन कर्णधाराकडून खूप अपेक्षा असतील.
RISHABH PANT ERA HAS BEGIN FOR LSG..!!!! 🌟
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 20, 2025
- Captain Rishabh Pant is Coming in IPL 2025 for Lucknow Supergiants. pic.twitter.com/cWO6tanKWq
पंत आणि गोएंका यांच्यातील खास संवाद : पंतच्या कर्णधारपदी नियुक्तीला दुजोरा देताना, लखनऊचे मालक गोयंका म्हणाले की, सर्व रणनीती ऋषभभोवती फिरत होत्या, हे सर्व त्याला लक्षात ठेवून केलं गेलं. गोयंका कडून पंत का? विचारले असता ते म्हणाले की, "मला वाटते की, वेळ सिद्ध करेल की तो केवळ आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू नाही तर आयपीएलचा सर्वोत्तम खेळाडू देखील आहे." एलएसजीचा नवीन कर्णधार म्हणून निवड झाल्यानंतर पंत म्हणाला, "आश्चर्यकारक, सरांनी माझ्याबद्दल जे काही सांगितलं ते ऐकून मी भारावून गेलो आहे."
Sanjeev Goenka said - " currently everyone said mahi & rohit are the most successful captains in ipl history. but i'm telling you mark my words after 10 years, people will say 'ms dhoni, rohit sharma & rishabh pant are the best captains in ipl'". pic.twitter.com/gwvgbSVlLq
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 20, 2025
हेही वाचा :