ETV Bharat / state

साताऱ्यातील तरुणीचा अमेरिकेत भीषण अपघात, मृत्यूच्या दारातील लेकीला पाहण्यासाठी वडिलांची इमर्जन्सी व्हिसासाठी धडपड - SATARA GIRL ACCIDENT

अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी (एमएस) गेलेल्या कराड तालुक्यातील उंब्रजच्या तरुणीचा कॅलिफोर्नियामध्ये भीषण अपघात झालाय. सध्या तिची प्रकृती चिंताजनक आहे.

satara girl accident
तरूणीचा भीषण अपघात (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 26, 2025, 10:47 PM IST

सातारा : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या उंब्रज (ता. कराड) येथील नीलम तानाजी शिंदे या तरुणीचा १४ फेब्रुवारी रोजी भीषण अपघात झाला. अपघातानंतर ती कोमात गेली असून तिच्यावर कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटोच्या हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मृत्यूच्या दारात असलेल्या लेकीला पाहण्यासाठी वडिलांना इमर्जन्सी व्हिसा हवा आहे. त्यासाठी त्यांची सरकार दफ्तरी आणि राजकीय नेत्यांकडं धावाधाव सुरू आहे.

इव्हिनिंग वॉकवेळी कारनं उडवलं : नीलम शिंदे ही गेल्या चार वर्षांपासून अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये शिक्षण घेत आहे. १४ फेब्रुवारी रोजी ती इव्हिनिंग वॉकला गेली असताना पाठीमागून एका कारनं तिला जोराची धडक दिली. अपघातात तिच्या दोन्ही हात, पाय आणि डोक्याला गंभीर इजा झाली. छातीला मार लागल्यानं ती कोमात गेली आहे. तिच्यावर सध्या कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटोमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लेक मृत्यूच्या दारात, वडिलांची व्हिसासाठी धावाधाव : अपघाताच्या घटनेला बारा दिवस झाले आहेत. मुलगी मृत्यूच्या दारात आहे. रक्ताचे नातेवाईक असल्याशिवाय कॅलिफोर्नियातील रुग्णालय प्रशासनाला कोणतीही रिस्क घेता येईना. तसंच पोलिसांना देखील गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात कायदेशीर अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत लेकीला पाहण्यासाठी तानाजी शिंदे यांची इमर्जन्सी व्हिसासाठी धावाधाव सुरू आहे.

इमर्जन्सी व्हिसासाठी राजकीय नेत्यांचे प्रयत्न : नीलमचे वडिल तानाजी शिंदे यांनी केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, माजी खासदार तथा सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार डॉ. अतुल भोसले, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन इमर्जन्सी व्हिसासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या पातळीवर प्रयत्न करण्याची विनंती केली. श्रीनिवास पाटील यांनी तातडीनं मेल करून परिस्थितीचं गांभीर्य परराष्ट्र मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपली राजकीय शक्ती पणाला लावत तातडीनं इमर्जनी व्हिसा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

लवकरच व्हिसा मिळण्याची अपेक्षा : मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एका वडिलांची आगतिकता आणि गरज लक्षात घेऊन वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. गुरूवारी त्यांना यासंदर्भात ठोस निर्णय कळेल, असं सांगण्यात आलंय. त्यामुळं लवकरच इमर्जन्सी व्हिसा मिळण्याची प्रक्रिया गतिमान झाल्याचं स्पष्ट होतंय.

हेही वाचा -

  1. ट्रक आणि रिक्षाची भीषण धडक; रिक्षामधील 7 मजुरांचा जागीच मृत्यू, तीन गंभीर
  2. रायपूरवरुन कुंभमेळ्याला जाणाऱ्या बसला अपघात; उभ्या ट्रेलरला धडकली बस, वाहक ठार
  3. 'रात अकेली है २' च्या शूटिंग सेटवर कार भिंतीवर आदळली, ड्रायव्हर जखमी, नवाजुद्दीन सिद्दीकी थोडक्यात बचावला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.