छत्रपती संभाजीनगर : राज्यात बांगलादेशी घुसखोरांबाबत जोरदार गदारोळ सुरू आहे. त्यात भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सिल्लोड मतदार संघात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी राहत असल्याचा आरोप केला. त्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली. सध्या देशात सरकार कोणाचं आहे, त्यांनी उत्तर द्यावं. सीमा ओलांडून लोक येत असतील, तर याला सरकार जबाबदार नाही का? किरीट सोमय्या यांनी सरकारला जाब विचारला पाहजे. सिल्लोडमध्ये तुमचे आमदार आहेत, ते पाहावं, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
भाजपाचे काही आमदार देखील नाराज : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेत नवीन उदय होणार असं वक्तव्य केलं. त्यावर बोलताना, "ते शक्य वाटत नाही, याबाबत काही सांगता येणार नाही, असं मत अंबादास दानवे यांनी व्यक्त केलं. नुसत्या शिवसेनेत नाही तर भाजपामध्या देखील अनेक अस्वस्थ आमदार आहेत, हे लक्षात घ्यावं लागेल. एकनाथ शिंदे नाराज आहेत, असं म्हणतात, म्हणून ते गावाकडं गेले अशी चर्चा आहे. मात्र नाराजी असो किंवा राजी असो, त्यामुळे एकनाथ शिंदे काहीही करू शकत नाहीत. भाजपा सोपी पार्टी नाही, ती शिंदेंना हलू देणार नाही. शिंदे किंवा त्यांचे सहकारी काहीही करू शकत नाहीत. मागच्या सरकारच्या अडीच वर्षात अनागोंदी झाली. त्यामुळे वेगळं उद्या असं काही होईल, मला वाटत नाही. एकनाथ शिंदे यांचं घर भाजपापेक्षा वेगळं नाही, ही भाजपा आहे. शिवसेना असती, तर वेगळं काम केलं असतं," अशी टीका दानवे यांनी केली.
संतोष देशमुख यांच्यासाठी कष्ट का नाही घेतले : "सैफ अली खानचे आरोपी शोधण्यासाठी मुंबई ठाणे इथली पथकं कामाला लाऊन आरोपी अटक करता. घटना मोठी आहे, आरोपीचा शोध घ्यायलाच पाहिजे, त्यावर आक्षेप नाहीच. मात्र, संतोष देशमुख यांचे आरोपी हाती लागले नाहीत. सैफ अलीसाठी जे एफर्ट घेत आहेत, सैफ अली खान प्रकरणाचा तपास सुरू आहे, काही गोष्टी समोर येतील. मात्र इतकेच कष्ट ते देशमुख यांचे अरोपी शोधण्यासाठी घेत नाहीत. एक महिना कशाला लागतो, अजून मूळ आरोपी का भेटले नाहीत, हा प्रश्न आहे," अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
सरकार लाडक्या बहिणीचे पैसे कधी वाढणार? : "निवडणुकीत प्रचार करताना लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं. मात्र पैसे वाढवणं दूरच उलट सरकार कपात करत आहे. अनेक बहिणींना त्यापासून दूर करण्याचा विचार आहे," असा आरोप अंबादास दानवे यांनी केला. तर धनंजय मुंडे यांनी एक वक्तव्यं केलं, भाजपा सोबत जाऊ नका, अशी विनंती अजित पवार यांना केली, असं ते म्हणाले. मात्र आज ते कोणासोबत आहेत, हे बघा," अशी टीका देखील त्यांनी केली.
सहपालक मंत्री बेकायदेशीर : "पालकमंत्री पदाची घोषणा झाली आणि अचानक दोन ठिकाणची पदं रद्द केले. चर्चा करून पालकमंत्री ठरवले नाही, असा अर्थ आहे. भाजपा इतर पक्षांना विचारात घेत नाही, तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाल्ल्याशिवाय अजित पवार, एकनाथ शिंदेंना पर्याय नाही. मुख्यमंत्री राज्याचे पालकमंत्री असताना एका जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याची इच्छा का झाली. मुख्यमंत्री काहीही करू शकतो, मग पालकमंत्री का झाले? तर सहपालकमंत्रिपद कायदेशीर नाही. पूर्णतः बेकायदेशीर आहे," असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं.
हेही वाचा :