मुंबई - विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या भूमिका असलेला ऐतिहासिक विषयावरील 'छावा' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धूमाकुळ घातला आहे. 'छावा' १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि त्याच्या प्रदर्शनाला आता ८ दिवस पूर्ण झालं आहेत. या चित्रपटाच्या जगभरातील कमाईचा आकडा पाहिला तर या चित्रपटानं एका आठवड्यात ३०० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे आणि देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 'छावा' हा चित्रपट विकी कौशलच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आतापर्यंत विकीच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट 'उरी - द सर्जिकल स्ट्राइक' ठरला होता.
'छावा' चित्रपटाचं ८ व्या दिवसाचं कलेक्शन - फिल्म ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांच्या मते, विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटानं आठव्या दिवशी २४.०३ कोटी रुपये कमावले आहेत. यासह, चित्रपटाचा देशांतर्गत बॉक्स ऑफिस कलेक्शनचा आकडा २४९.३१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, मॅडोक या चित्रपटाच्या निर्मिती संस्थेनं काल संध्याकाळी (२१ फेब्रुवारी) चित्रपटाच्या कमाईचे अधिकृत आकडे जाहीर केलं. 'छावा'नं एका आठवड्यात जगभरात ३१० कोटी रुपये आणि देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर २२५ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. 'छावा' दुसऱ्या आठवड्याच्या अखेरच्या दिवसात पोहोचला आहे. 'छावा' दुसऱ्या आठवड्याच्या कमाईसह देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा टप्पा गाठेल असा अंदाज केला जाऊ शकतो.
विकी कौशलचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
- छावा - २२५.२८ कोटी रुपये (देशांतर्गत), ३१०.५ कोटी रुपये (जगभरात) (पहिला आठवडा)
- उरी - द सर्जिकल स्ट्राईक - २४५.३६ कोटी रुपये (देशांतर्गत), ३४२.०६ कोटी रुपये (जगभरात)
- राजी - १२३.८४ कोटी रुपये (देशांतर्गत), १९५.७५ कोटी रुपये (जागतिक स्तरावर)
- सॅम बहादूर – ९२.९८ कोटी रुपये (देशांतर्गत), १२८.१७ कोटी रुपये (जागतिक स्तरावर)
- बॅड न्यूज - ६६.२८ कोटी रुपये (देशांतर्गत), ११५.७४ कोटी रुपये (जगभरात)
अशा प्रकारे 'छावा' या अलीडेच रिलीज झालेल्या विकी कौशलच्या चित्रपटानं त्याच्या 'उरी - द सर्जिकल स्ट्राईक'च्या एकूण कमाईला मागं टाकलं आहे.
तरण आदर्श यांच्या मते, 'छावा' चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर २४९.३१ कोटी रुपये कमावले आहेत आणि त्यानुसार विकीनं 'छावा' चित्रपटाच्या कमाईसह 'उरी - द सर्जिकल स्ट्राईक' या त्याच्या स्वतःच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा २४५.३६ कोटी रुपये (देशांतर्गत) विक्रम मोडला आहे. तरण आदर्शच्या मतानुसार, 'छावा' बॉक्स ऑफिसवर दररोज २० कोटींपेक्षा जास्त कमाई करत आहे. त्यामुळे या चित्रपटाची कमाई ४०० ते ५०० कोटी रुपयांपेक्षा कमी कमाई होणार नाही. ट्रेड विश्लेषकांनी असंही म्हटलंय की 'पुष्पा २' चित्रपटाशी बॉक्स ऑफिसवर कोणताही संघर्ष न झाल्यामुळे, 'छावा' आणि 'पुष्पा २' या दोघांनाही बॉक्स ऑफिसवर मोठा फायदा झाला आहे.
'उरी- द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटाचा जगभरातील कमाईच्या आकड्याला 'छावा' आठव्यादिवशी मागे टाकताना दिसत आहे. 'छावा'ची एकूण कमाई 310.5 कोटीहून अधिक होत असल्यामुळे विकी कौशलच्या 'उरी'चा हा विक्रम त्याच्याच 'छावा'नं रिलीजच्या आठव्या दिवशी मोडला आहे. अशा प्रकारे 'छावा' हा विकी कौशलचा आठ दिवसांच्या कलेक्शनसह जगभरातील बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनत आहे.
'छावा'चं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. याआधी लक्ष्मणनं विकीबरोबर 'जरा हटके जरा बच्चे' हा हिट चित्रपट बनवला होता. 'छावा' या चित्रपटात विकी कौशलनं छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. रश्मिका मंदान्ना यांनी संभाजी महाराजांच्या पत्नी येसूभाई भोसले यांची भूमिका साकारली असून अक्षय खन्नानं मुघल सम्राट औरंगजेबाची भूमिका साकारताना दिसत आहे.
हेही वाचा -