क्वालालंपूर ICC U19 Women's World Cup: सध्या ICC महिला अंडर-19 T20 विश्वचषक मलेशियामध्ये खेळला जात आहे. या स्पर्धेत आजच्या एका सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं सामोआचा पराभव केला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मोठा विजय मिळवला. यात प्रथम फलंदाजी करताना समोआचा संपूर्ण संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ 16 धावांवरच मर्यादित राहिला. सामोआनंही 16 धावांवर सर्वबाद होत विक्रम केला. सामोआची ही धावसंख्या आता ICC अंडर-19 महिला T20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या ठरली आहे.
सामोआनं 24 तासांत मोडला मलेशियाचा विक्रम
ICC अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येचा विक्रम यापूर्वी मलेशियाच्या नावावर होता. या स्पर्धेच्या चालू मोसमात त्यांनी श्रीलंकेच्या महिला संघाविरुद्ध 23 धावा केल्या होत्या. पण, सामोआ 16 धावांत ऑल आऊट झाला तेव्हा मलेशिया 23 धावांत ऑल आऊट होऊन केवळ 24 तास उलटले होते आणि नवा विक्रम प्रस्थापित झाला.
🚨 MATCH RESULT 🚨
— Proteas Women (@ProteasWomenCSA) January 20, 2025
An absolutely dominant performance from 🇿🇦 SA Women's U19 as they pick up the win against Samoa Women's U19 🇼🇸 by 10 Wickets.#AlwaysRising #U19WorldCup #WozaNawe #BePartOfIt pic.twitter.com/vHzKQkMqij
अर्धा संघ शून्य धावांवर बाद
सामोआनं या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. पण सुरुवातीपासूनच बिघडलेली त्यांची अवस्था पुन्हा रुळावर आली नाही. कारण समोर दक्षिण आफ्रिकेसारखा बलाढ्य संघ होता. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी सामोआच्या फलंदाजांची अशी अवस्था केली की अर्धा संघ शून्यावर बाद झाला. म्हणजेच या संघाचे 5 फलंदाज आपलं खातंही उघडू शकले नाही.
फलंदाजांपेक्षा अतिरिक्त धावा जास्त
सामोआच्या फलंदाजीच्या खराब स्थितीची आणखी एक खास गोष्ट म्हणजे त्यांच्याकडून कोणताही फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकला नाही. संघाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूनं 3 धावा केल्या. कोणत्याही फलंदाजाच्या बॅटमधून जादा धावा आल्या नाही. समोआविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी 6 अतिरिक्त धावा दिल्या.
दक्षिण आफ्रिकेनं 10 चेंडूत जिंकला सामना
समोआचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ 9.1 षटकांपर्यंत मर्यादित होता. त्यांनी 16 धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी केवळ 17 धावांचं लक्ष्य मिळालं. त्यांनी हे लक्ष्य केवळ 10 चेंडूत (1.4 षटकात) गाठलं. दक्षिण आफ्रिकेचा 2 सामन्यांतील हा सलग दुसरा विजय आहे. तर समोआचा स्पर्धेतील तितक्या सामन्यांमधील दुसरा पराभव.