मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी २०२५ रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यामध्ये भारतीय रेल्वे एक महत्वाचा घटक आहे. भारतीय रेल्वेचा दैनंदिन जीवनात आणि आर्थिक घडामोडींवर मोठा प्रभाव आहे. २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी १५,९४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
मुंबई-बुलेट ट्रेनची सुरूवात २०२० साली : मुंबई-बुलेट ट्रेन या प्रकल्पाची सुरूवात एप्रिल २०२० साली होणार होती. तर, डिसेंबर २०२३ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणार होता. परंतु, या कामासाठी जमीन मिळवण्याच्या कामात व्यत्यय येत असल्यामुळं हा बहुचर्चित प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. तर शकुंतला रेल्वे बोर्ड विकास विस्तार हा पश्चिम विदर्भसाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे. परंतु, पश्चिम विदर्भासाठीचा हा प्रकल्प अद्याप प्रलंबित आहे.
नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाचं काम कधी होणार : नाशिक-पुणे रेल्वे मार्ग दोन्ही जिल्ह्यांसाठी तसंच अहमदनगर जिल्ह्यासाठी महत्त्वाचा आहे. परंतु, या प्रकल्पाचं काम अजूनही रखडलेलं आहे. या रेल्वे प्रकल्पाची घोषणा 2008 साली करण्यात आली होती. 16 वर्षांनंतरही प्रकल्पाचं काम पूर्ण झालं नाही. त्यामुळं यंदाच्या अर्थ संकल्पाच्या माध्यमातून तरी या प्रकल्पाचं काम पूर्ण होणार का? याकडं सर्वांचं लक्ष आहे. तर अहमदनगर-परळी वैजनाथ हा रेल्वेमार्ग प्रकल्प फेब्रुवारी २०२१ मध्ये पूर्ण होणार होता. परंतु, आता हा प्रकल्प डिसेंबर २०२५ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. वर्धा-नांदेड हा मध्य रेल्वेचा प्रकल्प एप्रिल २०२३ मध्ये पूर्ण होणार होता. परंतु, आता तो डिसेंबर २०२६ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
वर्धा-बल्हारशाह, तिसरी लाईन : कल्याण-कसारा तिसरा मार्ग हा मध्य रेल्वे प्रकल्प मार्च २०२१ मध्ये पूर्ण होणार होता. परंतु, आता हा प्रकल्प डिसेंबर २०२५ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तर वर्धा-सेवाग्राम तिसरी लाईन हा मध्य रेल्वेचा प्रकल्प मार्च २०२२ मध्ये पूर्ण होणार होता. परंतु आता तो मे २०२५ मध्ये पूर्ण होण्याचा अंदाज आहे. तसंच वर्धा-बल्हारशाह, तिसरी लाईन हा मध्य रेल्वेचा प्रकल्प मार्च २०२२ मध्ये पूर्ण व्हायला हवा होता. परंतु, आता तो ऑगस्ट २०२५ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे.
'या' प्रकल्पाचं काम मार्च 2025 मध्ये पूर्ण होणार : इटारसी-नागपूर (बालबाल), तिसरी लाईन (२६७ किमी) हा मध्य रेल्वेचा हा प्रकल्प मार्च २०२३ मध्ये पूर्ण होणार होता. परंतु, आता तो मार्च २०२७ मध्ये पूर्ण होण्याची आशा आहे. तर पुणे-मिरज-लोंढा (४६७ किमी) हा मध्य रेल्वे या प्रकल्पाचं काम मार्च २०२४ मध्ये पूर्ण होणं अपेक्षित होतं. परंतु, आता हा प्रकल्प जानेवारी २०२५ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तसंच मनमाड-जळगाव, तिसरी लाईन (१६० किमी) या मध्य रेल्वेच्या मनमाड-जळगाव या मार्गावरील तिसऱ्या लाईनचं काम मार्च २०२२ मध्ये पूर्ण होणं अपेक्षित होतं. परंतु, या प्रकल्पाचं काम मार्च 2025 मध्ये पूर्ण होईल अशी आशा आहे.
'या' प्रकल्पाचं काम डिसेंबर २०२६ मध्ये पूर्ण होणार : वर्धा-नागपूर, चौथी लाईन (७६ किमी) मध्य रेल्वेचा हा प्रकल्प मार्च २०२३ मध्ये पूर्ण होणार होता. परंतु आता तो मे २०२५ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तर राजनांदगाव-नागपूर, तिसरी लाईन (एसईसीआर) हा आग्नेय मध्य रेल्वेचा प्रकल्प मार्च २०२३ मध्ये पूर्ण होणार होता. परंतु, आता तो डिसेंबर २०२५ मध्ये पूर्ण होणार आहे. तसंच वडसा-गडचिरोली नवीन लाईन (५२.३६ किमी) हा आग्नेय मध्य रेल्वेचा प्रकल्प डिसेंबर २०२१ मध्ये पूर्ण होणार होता. परंतु, आता तो डिसेंबर २०२६ मध्ये पूर्ण होणार आहे.
'हा' प्रकल्प मार्च २०२५ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा : पाचोरा-जामनेर मलकापूर एनजी ते बीजी पर्यंत विस्तारित हा मध्य रेल्वेचा हा प्रकल्प ऑगस्ट २०२७ मध्ये पूर्ण होणार होता. परंतु, आता तो मार्च २०२९ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तर धुळे (बोरविहिर)-नरदाणा हा मध्य रेल्वेचा हा प्रकल्प मार्च २०२६ मध्ये पूर्ण होणार होता. परंतु आता तो सप्टेंबर २०२७ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तसंच मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प IIIA हा मुंबई रेल्वे विकास महामंडळाचा हा प्रकल्प मार्च २०२५ मध्ये पूर्ण होणार होता. परंतु, आता तो डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर नागपूर-नागभीड रेल्वे लाईन गेज रुपांतरण हा महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेडचा हा प्रकल्प जून २०२४ मध्ये पूर्ण होणार होता. परंतु अद्याप पूर्ण झालेला नाही. हा प्रकल्प मार्च २०२५ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा -