ETV Bharat / entertainment

श्रेया घोषाल डोळ्यातलं अश्रू रोखू शकली नाही, शेअर केला कोल्डप्लेच्या मुंबई कॉन्सर्टमधील व्हिडिओ - SHREYA GHOSHAL ON COLDPLAY BAND

श्रेया घोषालनं मुंबईत पार पडलेल्या कोल्डप्ले बँडच्या परफॉर्मन्सनंतर एक भावनिक पोस्ट लिहिलीय. एका गाण्याच्या प्रसंगी ती आपले अश्रू रोखू शकली नव्हती.

Shreya Ghoshal
श्रेया घोषाल ((Photo/instagram/@shreyaghoshal/ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 20, 2025, 7:35 PM IST

Updated : Jan 20, 2025, 7:51 PM IST

मुंबई - १९ जानेवारी रोजी मुंबईत कोल्डप्लेच्या कॉन्सर्टला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. दिग्गज सेलेब्रिटीसह सामान्य प्रेक्षकांनी या डोळं दीपवून टाकणाऱ्या इव्हेन्टचा आनंद लुटला. या कार्यक्रमाला हजर राहिल्यानंतर पार्श्वगायिका श्रेया घोषालनं एक भावनिक अनुभव शेअर केला. डीवाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या या कॉन्सर्टला श्रेया, तिचा पती शिलादित्य मुखोपाध्याय आणि तिचे वडील विश्वजीत घोषाल यांच्यासह उपस्थित होती.

श्रेयानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरी अकाउंटवर कोल्डप्ले बँडवरील प्रेम व्यक्त करताना कॉन्सर्टमधील अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. एका क्लिपमध्ये, गायिका विनोदी पद्धतीने म्हणते की, "कॉन्सर्टला उपस्थित राहण्यासाठी खूपच काम करावं लागतं. त्यापेक्षा मंचावर राहणं अधिक उत्तम असतं," तिचा हा व्हिडिओ इव्हेन्टला जात असताना तिच्या पतीनं रेकॉर्ड केला आहे.

पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये श्रेयानं लिहिलंय की, "कोल्डप्लेबाबत अतिशय शुद्ध प्रेम वाटतं. सर्वकाही जाणून घेण्यासाठी शेवटच्या व्हिडिओपर्यंत स्वाइप करा. अद्भुत क्रिस मार्टिन आणि त्याच्या बँडचा माझा हा दुसरा कॉन्सर्ट! ...तुम्ही मुंबईसाठी तुमची जादू चालू केली !! तो एक अद्भुत अनुभव होता. फिक्स यू साठी माझे अश्रू रोखू शकलो नाही! माझे ७०वर्षांचे वडीलबिश्वजीत घोषाल यांना कॉन्सर्ट खूप आवडला!!! मला आणि शिलादित्यला आमच्या लहानपणी आमच्या आयुष्यावर राज्य करणाऱ्या सर्व आठवणी पुन्हा एकदा जिवंत केल्याबद्दल धन्यवाद. श्रेयानं इंस्टाग्राम स्टोरीजवर एक व्हिडिओ देखील शेअर केला, जिथे ती कोल्डप्लेचा लाईव्ह परफॉर्मन्स पाहताना भावनिक झालेली दिसत आहे.

दरम्यान, शनिवारी, म्यूझिक कॉन्सर्टदरम्यान, नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये स्टेजवर त्यांचे शेवटचे गाणे सादर करत असताना, कोल्डप्लेचे आघाडीचे गायक क्रिस मार्टिन यांनी अचानक भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहचे नाव घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केलं. ख्रिस मार्टिन म्हणाला, "थांबा, आपल्याला शो संपवावा लागेल कारण जसप्रीत बुमराह स्टेजवर येऊन खेळायची इच्छा आहे." चाहत्यांचे आभार मानल्यानंतर मार्टिन पुढे म्हणाले, "तो (बुमराह) म्हणतो की त्याला आता माझ्यासाठी बॉलिंग करायची आहे."

बँडचे भारतात आणखी तीन कार्यक्रम होणार आहेत. कोल्डप्ले बँड २१ जानेवारी मुंबईत आणि २५ आणि २६ जानेवारी अहमदाबादमध्ये आपला जलवा दाखवणार आहे.

Last Updated : Jan 20, 2025, 7:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.