ETV Bharat / technology

टाटा हॅरियर आणि टाटा सफारी स्टील्थ एडिशन प्रगत वैशिष्ट्यांसह लाँच - TATA HARRIER AND TATA SAFARI

टाटा हॅरियर आणि टाटा सफारी स्टील्थ एडिशन भारतात लॉंच झाल्या आहेत. या दोन्ही एसयूव्हीमध्ये प्रगत वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

Tata Harrier and Tata Safari
टाटा हॅरियर आणि टाटा सफारी (Tata)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Feb 22, 2025, 12:18 PM IST

हैदराबाद : टाटा हॅरियर आणि टाटा सफारी एसयूव्हीचे स्टील्थ एडिशन प्रकार भारतात लाँच झाले आहेत. टाटा मोटर्सनं त्यांच्या किमतीही जाहीर केल्या आहेत. या दोन्ही एसयूव्हींना एक्सक्लुझिव्ह मॅट ब्लॅक रंग, एक शार्प आणि स्टिल्थ लूक देण्यात आला आहे. त्यानंतर त्यांचा लूक पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम आणि आकर्षक झाला आहे. या स्पेशल एडिशनमध्ये दोघीही खूपच आकर्षक दिसत आहेत.

एडिशन प्रकारांच्या किमती जाहीर
टाटा मोटर्सने टाटा हॅरियर आणि टाटा सफारी एसयूव्हीच्या स्टील्थ एडिशन प्रकारांच्या किमती जाहीर केल्या आहेत. त्याची एक्स-शोरूम किंमत 25.09 लाख रुपयांपासून सुरू होते. या नवीन आवृत्तीत, टाटा हॅरियर आणि टाटा सफारीला मॅट ब्लॅक एक्सटीरियर फिनिशसह स्टेल्थ ब्लॅक इंटीरियर थीम देण्यात आली आहे.

व्हेरिएंटनुसार किंमती (एक्स-शोरूम)

Tata Safari Stealth Edition

  • स्टेल्थ एडिशन एमटी - 25.29 लाख रुपये
  • स्टेल्थ एडिशन एटी - 27.34लाख रुपये
  • 6-सीटर एटी स्टेल्थ एडिशन - 26.44 लाख रुपये

Tata Harrier Stealth Edition

  • स्टेल्थ एडिशन एमटी -25.09लाख रुपये
  • स्टेल्थ एडिशन एटी - 26.24लाख रुपये

डिझाइन
टाटा हॅरियर आणि सफारीच्या या स्पेशल एडिशनमध्ये एक्सक्लुझिव्ह मॅट ब्लॅक रंगात एक शार्प आणि स्टिल्थ लूक आहे. आकर्षक लूक देण्यासाठी, ब्लॅक ग्रिल, ब्लॅक अलॉय व्हील्स आणि ब्लॅक ओआरव्हीएमसह अनेक ब्लॅक-आउट घटक समाविष्ट केले आहेत. दोन्ही एसयूव्हीचं उर्वरित डिझाइन घटक आणि सिल्हूट अपरिवर्तित आहेत. डिझाइनच्या बाबतीत, या स्पेशल एडिशनमध्ये दोन्ही एसयूव्ही खूपच आकर्षक दिसतात.

वैशिष्ट्ये
स्टँडर्ड सफारी आणि हॅरियरचे इंटीरियर अतिशय प्रीमियम लूक आणि दर्जेदार आहेत, परंतु स्टील्थ एडिशनच्या इंटीरियरमध्ये पूर्णपणे काळ्या रंगाची स्कीम आहे, ज्यामुळे ती पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम आणि स्पोर्टी दिसते. एवढंच नाही तर केबिनमध्ये काळी अपहोल्स्ट्री आणि अनेक ग्लॉस ब्लॅक इन्सर्ट देखील समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यांच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर, त्याच्या टॉप फीचर्समध्ये 12.3 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 360-डिग्री कॅमेरा, पॉवर्ड आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, पॉवर्ड टेलगेट, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, मल्टी-कलर अॅम्बियंट लाइटिंग आणि लेव्हल-2 ADAS यांचा समावेश आहे.

इंजिन पर्याय
टाटा हॅरियर आणि टाटा सफारी एसयूव्हीच्या स्टील्थ एडिशन प्रकारांमध्ये कोणतेही यांत्रिक बदल केलेले नाहीत. त्यात पूर्वीप्रमाणेच 2-लिटर डिझेल इंजिन आहे. त्यात दिलेलं इंजिन 170 पीएस पॉवर आणि 350 एनएम टॉर्क जनरेट करतं. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेलं आहे.

हे वाचलंत का :

  1. नवीन वैशिष्ट्यांसह अपडेटेड किआ सेल्टोस लाँच, व्हेरिएंटची किंमत, वैशिष्ट्ये, तपशील जाणून घ्या
  2. अपडेटेड 2025 Kia Carens लवकरच भारतीय बाजारात लाँच होणार
  3. टाटा सिएरा लवकरच भारतात लाँच, जाणून घ्या काय आहे खास?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.