मेष (Aries) : हा आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला आहे. ज्यांना नोकरी बदलावयाची आहे ते या आठवड्यात ती बदलू शकतात. आपली तंदुरुस्ती टिकवून ठेवण्यासाठी योगासन, व्यायाम इत्यादींचा अवलंब करावा. व्यापाऱ्यांसाठी सुद्धा आठवडा चांगला आहे. त्यांना उन्नतीची संधी मिळू शकते. ह्या आठवड्यात प्रेमीजनांच्या संबंधात एखाद्या शंकेमुळं काहीशी कटुता येऊन नात्यातील दुरावा वाढण्याची संभावना आहे. कदाचित प्रेमभंग सुद्धा होऊ शकतो. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. कुटुंबातील शांतता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. नात्यात गोडवा निर्माण होऊ शकतो. एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्यात आपला फायदा संभवतो. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे.
वृषभ (Taurus) : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण एखाद्या मानसिक तणावानं त्रस्त असण्याची संभावना आहे. त्यामुळं आपणास नैराश्य येण्याची शक्यता सुद्धा आहे. ह्या आठवड्यात आपणास आपल्या व्यवसायात सावध राहावं लागेल. व्यवसायात आपणास चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळं आपण त्रस्त होण्याची संभावना आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा तणावाचा आहे. कामानिमित्त आपणास प्रवास सुद्धा करावा लागू शकतात. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीमुळं आपणास जास्त फायदा होऊ शकतो. ह्या आठवड्यात प्रेमीजनांची मनस्थिती प्रेमिकेशी रोमांस करण्यात वेळ घालविण्याची असेल. वैवाहिक जीवनात क्रोधामुळं तणाव निर्माण होऊ शकतो. आपणास जर परदेशात जावयाचं असेल तर आपण आपलं प्रयत्न चालूच ठेवावेत. आपण त्यात नक्कीच यशस्वी व्हाल. आपणास जर एखादं वाहन खरेदी करावयाचं असेल तर ते कर्जावर घेण्यात आपण यशस्वी व्हाल.
मिथुन (Gemini) : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण जर अनेक दिवसांपासून पोटाच्या विकारानं त्रस्त असाल तर आता हळू हळू त्यातून आपली सुटका होऊ शकते. आपला व्यापार खूपच चांगला होईल. नोकरी करणाऱ्यांना सुद्धा चांगली संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांना कमी श्रमात सुद्धा यश प्राप्ती होऊ शकते. प्रणयी जीवनात अहंकार आणि शंकेमुळं तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळं आपसातील संबंध काहीसे बिघडू शकतात. आपला वैवाहिक जोडीदार जर आपणास वेळ देऊ शकत नसेल तर तिची मजबुरी समजून घेण्याचा प्रयत्न करा.
कर्क (Cancer) : ह्या आठवड्यात ऋतू बदलामुळं आपण सर्दी, खोकला इत्यादी समस्येने त्रस्त होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनी कष्ट करून आपली कामे केल्यास ते ती वेळेवर पूर्ण करू शकतील. नोकरी करणाऱ्यांनी कार्यालयातील राजकारणापासून दूर राहावं, अन्यथा नोकरीत त्रास होऊ शकतो. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपला एखादा नातेवाईक शिक्षणा संबंधी चांगला सल्ला देण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात आपल्या एखाद्या जुन्या परंतु आवडत्या व्यक्तीशी आपलं प्रेम जुळण्याची संभावना आहे. हा आठवडा विवाहितांसाठी अत्यंत अनुकूल आहे. आपण आपल्या जोडीदारासाठी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करून तिला एखादी मोठी भेटवस्तू सुद्धा देऊ शकाल.
सिंह (Leo) : हा आठवडा आपल्यासाठी सामान्यच आहे. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित संधी मिळू शकते. व्यावसायिकांसाठी सुद्धा आठवडा चांगला आहे. ते एखाद्या मोठ्या संमेलनात सहभागी होऊ शकतात. ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीची थोडी काळजी घ्यावी लागेल. आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावं. अन्यथा आपलं जुने विकार पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. ह्या आठवड्यात आपली आर्थिक स्थिती मजबूत राहील. प्रणयी जीवनात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळं आपण आणि आपली प्रेमिका ह्यात दुरावा येऊ शकतो. आपल्या घमंडामुळं वैवाहिक जीवनात थोडा तणाव निर्माण होऊ शकतो. आपला घमंड बाजूस ठेवून जोडीदारास आपल्या मनातील विचार सांगावेत. त्यामुळं आपल्यातील समस्यांचं निराकरण होऊन एकमेकांच्या हृदयातील स्थान पुन्हा प्रस्थापित करण्यात आपण यशस्वी होऊ शकाल. ह्या आठवड्यात थोडा वेळ आपल्या मुलांसाठी सुद्धा काढावा.
कन्या (Virgo) : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. त्यांची पदोन्नती संभवते. व्यापाऱ्यांना मात्र ह्या आठवड्यात थोडं सावध राहावं लागेल. कोणताही नवीन व्यवसाय सुरु करण्यापूर्वी तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा. ह्या आठवड्यात आपली तंदुरुस्ती टिकवून ठेवण्यासाठी सकाळचे चालणे, योगासन इत्यादींना आपल्या दिनचर्येत समाविष्ट करावं. असं केल्यास आपण निरोगी राहू शकाल. अन्यथा आजारपण पुन्हा उफाळून येऊ शकते. विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी चांगली संधी प्राप्त होऊ शकते. ह्या आठवड्यात आपलं खूप वायफळ खर्च होतील. ह्या आठवड्यात प्रेमीजन आपल्या प्रेमिकेवर शंका घेऊ लागल्यानं त्यांच्या नात्यात बिघाड होऊ शकतो. वैवाहिक जीवन सुखद होईल. आपण आपल्या जोडीदाराच्या सहवासात खुश राहाल.
तूळ (Libra) : हा आठवडा आपणास सामान्य आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या सध्याच्या नोकरीत बदल न करता आहे तीच नोकरी कायम ठेवावी. व्यापार करणाऱ्यांनी सुद्धा थोडं सावध राहावं. त्यांनी आपलं सरकारी दस्तावेज व्यवस्थित ठेवावेत, हा आठवडा आपणास सामान्य आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या सध्याच्या अन्यथा त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी छापा पडून ते संकटात सापडू शकतात. ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्राप्तीच्या प्रमाणात जास्त खर्च झाल्यानं सुद्धा आपण त्रासून जाऊ शकता. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी मिळू शकते. प्रणयी जीवनात आपल्या घमंडामुळं तणावाची परिस्थिती निर्माण होऊन आपलं नातं तुटू सुद्धा शकते. वैवाहिकजीवनात सुद्धा भांडणाची भावना राहील, जी आपणास सोडावी लागेल, अन्यथा नाते तुटण्यापर्यंत परिस्थिती जाऊ शकते.
वृश्चिक (Scorpio) : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य राहील. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती संभवते. व्यावसायिकांना एखादा नवीन आर्थिक भागीदार मिळू शकतो. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यश प्राप्ती होऊ शकते. आपला बराचसा पैसा परदेशात जाण्यासाठी किंवा कुटुंबाच्या प्रगतीसाठी खर्च होऊ शकतो. आपल्या व्यस्ततेमुळं आपण प्रेमिकेस योग्य तितका वेळ देऊ न शकल्यानं संबंधात तणाव निर्माण होऊ शकतो. आपल्या वैवाहिक जीवनात सुद्धा तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आपण आपलं संबंध सुधारण्याचा प्रयत्न करावा. आपण असं न केल्यास जोडीदार स्वतःला अपराधी समजू लागेल आणि त्यामुळं आपलं वैवाहिक जीवन कमकुवत होऊन जाईल.
धनु (Sagittarius) : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. ह्या आठवड्यात नोकरी करणाऱ्या व्यक्तींची पदोन्नती संभवते. आपल्या कार्यालयात आपल्या कामगिरीची प्रशंसा केली जाऊ शकते. त्यामुळं आपण अत्यंत खुश व्हाल. व्यापार करणाऱ्यांसाठी सुद्धा आठवडा चांगला आहे. व्यापारी त्यांच्या व्यापारानिमित्त परदेशात प्रवास करू शकतात. त्यांच्या नवीन ओळखी होतील. आपलं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या दिनचर्येत आपणास व्यायाम, योगासन इत्यादींचा समावेश करावा लागेल. प्रेमीजनांचं संबंध नाजूक अवस्थेत असल्यानं त्यांनी सध्या सावध राहावं. वैवाहिक जीवन सुखद होईल. आपण वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात भरपूर वेळ घालवू शकाल. आपण त्यांना एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास सुद्धा घेऊन जाऊ शकाल.
मकर (Capricorn) : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी अत्यंत सावध राहावं लागेल वरिष्ठ आपल्या कामगिरीने प्रसन्न होतील. आरोग्याच्या दृष्टीनं हा आठवडा सामान्य राहील. डोकेदुखीचा त्रास पुन्हा उदभवू शकतो. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. पूर्वीचा व्यवसाय पुन्हा सुरु करू शकाल. आपण आपल्या व्यापारात भरपूर पैसा मिळवू शकाल. आपली आर्थिक स्थिती उंचावेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात थोडा त्रास होऊ शकतो. अभ्यासात त्यांचं लक्ष लागणार नाही. आपलं प्रणयी जीवन अधिक मधुर होईल. आपण प्रेमिकेसह बाहेर फिरावयास जाऊ शकता. दांपत्य जीवन सुद्धा अधिक सुखद होईल. आपण आपल्या वैवाहिक जोडीदाराप्रती जास्त आकर्षित होऊन आपला अधिकांश वेळ त्यांच्या सहवासात घालवाल.
कुंभ (Aquarius) : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य आहे. आपण जर सतत आजारी पडत असाल तर ह्या आठवड्यात आपल्या डॉक्टरांकडून शारीरिक तपासणी जरूर करून घ्यावी. ह्या आठवड्यात आपला व्यवसाय आणि कारकीर्द चांगली चालेल. आपला परदेशाशी सुद्धा संबंध येऊ शकतो आणि त्यामुळं आपणास अधिक पैसा सुद्धा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा आठवडा चांगला आहे. आपण जेथे नोकरी करत आहात तेथे आपली उन्नती होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी आठवडा काहीसा त्रासदायी असू शकतो. अभ्यासात त्यांचं लक्ष लागणार नाही. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आठवडा प्रतिकूल आहे. प्रेमीजनांचं संबंध बिघडण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात तणाव राहील. आपण आपला घमंड बाजूस सारून आपल्या नात्यात माधुर्य निर्माण करावे.
मीन (Pisces) : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. ह्या आठवड्यात आपली प्रकृती चांगली राहिली तरी खाण्या - पिण्यावर आपणास संयम ठेवावा लागेल. एखाद्या मानसिक ताणामुळं आपणास एकटेपणा जाणवू शकेल. ह्या आठ्वड्यात कुटुंबासाठी आपण जास्त पैसा खर्च करू शकाल. आपला व्यवसाय सुद्धा चांगला चालेल. आपण आपल्या व्यवसायात खूप प्रगती कराल. नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा आठवडा चांगला आहे. ज्यांना आपली नोकरी बदलावयाची आहे, त्यांच्यासाठी हा आठवडा सकारात्मक आहे. प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेच्या प्रेमात पूर्णतः भिजून गेल्याचं दिसून येईल. वैवाहिक जोडीदाराशी सुद्धा आपलं नातं दृढ होईल. विद्यार्थी जर एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांना त्यात यश प्राप्त होऊ शकतं. सरकारी नोकरी मिळण्याची सुद्धा शक्यता आहे.
हेही वाचा -
'वसंत पंचमी' दिनी विठ्ठल-रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा; पाहा व्हिडिओ