अभिनेत्री उर्मिला मातोंडकर साईचरणी लीन, दर्शनानंतर म्हणाली... - URMILA MATONDKAR IN SHIRDI
🎬 Watch Now: Feature Video


Published : Feb 23, 2025, 11:45 AM IST
शिर्डी : प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं (Actress Urmila Matondkar) शनिवारी (22 फेब्रुवारी) शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. यावेळी तिनं साईबाबांच्या धुपाआरतीलाही सहकुटुंब हजेरी लावली. साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना ती म्हणाले की, "मी जिथं कुठं जाते, तिथं साईबाबा माझ्यासोबत असतात. शिर्डीत आल्यावर एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळते. साईबाबांच्या चरणी नतमस्तक होतांना नेहमीच श्रद्धेनं माझं मन भरून येतं. साईंची आरती कितीही वेळा केली तरी आरती पुन्हा पुन्हा करावी, असं वाटतं. भक्तांसाठी साईबाबांची शिर्डी ही केवळ एक तीर्थक्षेत्र नाही. तर एक आत्मिक शांततेचं ठिकाण आहे." नुकताच प्रदर्शित झालेल्या 'छावा' या चित्रपटाबाबत बोलताना उर्मिला म्हणाली की, "चित्रपट अतिशय उत्तम असल्याची चर्चा आहे. मी अजून चित्रपट पाहिलेला नाही. पण यातील सर्व कलाकारांनी उत्कृष्ट कामगिरी बजावल्याची माझी माहिती आहे." तसंच हा चित्रपट ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरणार असल्याचंही उर्मिलानं सांगितलं. यावेळी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उर्मिला मातोंडकरचा साईंची शाल तसंच साई मूर्ती देऊन सत्कार केला.