मुंबई : यो यो हनी सिंगनं टी-सीरीज आणि भूषण कुमार यांच्याबरोबर मिळून 'मैनियाक' हा आणखी एक जोरदार ट्रॅक निर्मित केला आहे. हे अद्भुत गाणं ईशा गुप्तावर चित्रित करण्यात आलं आहे. हनीनं हे गाणे स्वतः संगीतबद्ध केलंय, विशेष म्हणजे यात पंजाबीबरोबर भोजपुरीचा तडका देखील आहे. हे गाणं आता प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव आहे. यो यो हनी सिंगनं त्याच्या गाण्याची पोस्ट अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर करताना लिहिलं, 'कोणतेही नियम नाहीत, फक्त वेडेपणा.' 'मैनियाक'मधील भोजपुरी बोल रागिनी विश्वकर्मा यांनी गायली आहेत. तसेच यो यो हनी सिंगनं सुरांचा उस्ताद शैल ओसवालबरोबर देखील सहकार्य केलं आहे. या गाण्यात ईशा गुप्तानं जबरदस्त डान्स केला आहे.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव : लोक या गाण्याचे खूप कौतुक करत आहेत. एका यूजरनं या गाण्याबद्दल लिहिलं, 'याला पुनरागमन म्हणतात.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'प्रिय पाजी, उत्तर प्रदेश आणि बिहारमधून धन्यवाद.' आणखी एकानं कमेंटमध्ये लिहिलं, 'यो यो हनी सिंग, तुझ्यासारखा कोणी नाही.' यो यो हनी सिंगनं 'ब्लू आयज', 'अंग्रेजी बीट', 'ब्राउन रँग' असे अनेक हिट ट्रॅक दिले आहेत. दरम्यान काही वर्षांपासून हनी सिंग शारीरिक आरोग्यामुळे इंडस्ट्रीपासून गायब होता. आता तो परतला आहे, चाहते त्याच्या दमदार पुनरागमनाची वाट पाहत होते. शेवटी हनी परत आल्यानंतर त्यानं अनेक गाणी तयार केली आहेत.
हनी सिंग मिलिनियर टूरवर : यो यो हनी सिंगचा एक माहितीपट नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये त्यानं त्याच्या आयुष्यातील सर्व संघर्ष आणि प्रवासाबद्दल सांगितलं होतं. या माहितीपटात त्याच्या अधोगतीपासून तर यशापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाचं नाव 'यो यो हनी सिंह फेमस' हे आहे. दुसरीकडे, हनी सिंगनं संपूर्ण भारतात त्याचा मिलियनेअर टूर सुरू केला आहे. शनिवारी रात्री मुंबईत त्यांचा पहिला संगीत कार्यक्रम झाला आणि त्यानंतर तो दिल्ली, अहमदाबाद, बेंगळुरू आणि कोलकाता यासह 10 शहरांमध्ये सादरीकरण करणार आहे. दरम्यान हनी सिंग मिलिनियर टूरवरून परत आल्यानंतर अनेक गाणी बनवेल, अशी अपेक्षा केली जात आहे.
हेही वाचा :