शेवटी आईच ती! ताटातूट झालेल्या बछड्यांना घेऊन गेली मादी बिबट्या, पाहा व्हिडिओ - MOTHER LEOPARD NEWS

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 20, 2025, 3:12 PM IST

सातारा -आईपासून ताटातूट झालेली बिबट्याची चार पिल्लं उसाच्या शेतात आढळून आली. त्या पिल्लांची मादी बिबट्याशी भेट घडवून आणण्यात वन विभाग आणि वाईल्ड हार्ट रेस्कूअर्स टीमला यश आलं. कराड तालुक्यातील चचेगावात बाराभाईंची विहिर नावाच्या शिवारात बुधवारी (१९ फेब्रुवारी) दुपारी ऊस तोडणी सुरू होती. त्यावेळी बिबट्याची सव्वा महिन्यांची चार पिल्लं आढळून आली. ही माहिती मिळताच वन विभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं. चारपैकी तीन पिल्लं नर आणि एक पिल्लू मादी जातीचं होतं. आईपासून ताटातूट झालेल्या पिल्लांना बकेटमध्ये ठेवण्यात आलं. बुधवारी सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी मादीनं पहिलं पिल्लू नेलं. त्यानंतर ठराविक अंतरानं मादी उर्वरीत तिन्ही पिल्लं घेऊन गेली. वन विभागानं लावलेल्या दोन ट्रॅप आणि तीन लाईव्ह कॅमेऱ्यात मादी बिबट्या आणि पिल्लांची पुनर्भेट कैद झालीय. वनक्षेत्रपाल ललिता पाटील, वनपाल आनंद जगताप, बाबूराव कदम, वनरक्षक अक्षय पाटील, योगेश बडेकर, कैलास सानप, भरत पवार यांच्यासह वाईल्ड हार्ट रेस्क्युअर्स टीमचे अजय महाडिक, रोहित कुलकर्णी, गणेश काळे, सचिन मोहिते, रोहित पवार, विशाल साठे यांनी बिबट्या आणि पिल्लांच्या भेटीसाठी प्रयत्न केले. मागील वर्षभरात बिबट्या, उदमांजर, वाघाटीसह अन्य प्राण्यांच्या २८ पिल्लांची पुनर्भेट घडवून आणण्यात वन विभाग यशस्वी झालाय. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.