शिवजयंती निमित्त मुस्लिम मावळ्यांकडून पुण्यातील कोंढव्यात राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन - SHIVJAYANI 2025
🎬 Watch Now: Feature Video


Published : Feb 19, 2025, 10:54 PM IST
पुणे : आज पुण्यातील कोढवा इथं मुस्लिम मावळा फाउंडेशनच्या वतीनं सर्वधर्मीय शिवजयंती सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये मुस्लिम समाजातील युवक, महिला आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या शिवजयंती सोहळ्याचं आयोजन मुस्लिम मावळा फाउंडेशनचे हाजी गफूर पठाण यांनी केलं होतं. "सर्व धर्मियांना समान न्याय देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मुस्लिम मावळे आहोत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सालाबादप्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला वंदन करुया आणि त्यांच्या विचारांना उजाळा देऊया. शिवाजी महाराजांचे सर्वधर्म समभावाचे विचार समजापर्यंत पोहचणं गरजेचं आहे." असं आयोजक मुस्लिम मावळा फाउंडेशनचे हाजी गफूर पठाण यांनी व्यक्त केलं.