दुबई PAK vs IND 5th Match : चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्वात मोठा सामना आज भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघात खेळला जात आहे. हा सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरु आहे. यात भारतीय कर्णधार रोहित शर्मानं पुन्हा एकदा नाणेफेक गमावली. मोहम्मद रिझवाननं नाणेफेक जिंकून खेळपट्टीची स्थिती लक्षात घेऊन प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानी संघात एक बदल करण्यात आला आहे, तर टीम इंडियात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमान दुखापतीमुळं संपूर्ण स्पर्धेतून बाहेर आहे, त्यामुळं इमाम उल हकला संधी देण्यात आली आहे. दरम्यान, जेव्हा भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पहिलं षटक टाकण्यासाठी आला तेव्हा त्यानं अशा पद्धतीनं गोलंदाजी केली की चॅम्पियन्स ट्रॉफीचा विक्रम मोडण्यापासून वाचला.
• 26th January 2016 : Hardik Pandya became the first and only Indian player to bowl 5 wides in an over in T20I against Australia. It was his first ever over in T20I.
— All Cricket Records (@Cric_records45) February 23, 2025
• 23rd February 2025 : Mohammed Shami became the first Indian to bowl 5 wides in an over in ODI against… pic.twitter.com/fTnUhDVjSc
पहिल्याच षटकात मोहम्मद शमीचे 5 वाईड बॉल : जेव्हा टीम इंडिया गोलंदाजी करायला आली तेव्हा पहिलं षटक मोहम्मद शमीला देण्यात आलं. पहिल्याच षटकात शमी पाकिस्तानला धक्का देईल अशी अपेक्षा होती, पण घडलं उलटंच. पहिल्याच षटकात मोहम्मद शमीनं अनेक वाईड बॉल टाकले. साधारणपणे एका षटकात 6 चेंडू टाकावे लागतात, पण शमीनं त्या षटकात 11 चेंडू टाकले, कारण शमीनं त्या षटकात 5 वाईड चेंडू टाकले. शमीच्या आधी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फक्त दोनच गोलंदाज असे होते ज्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्याच्या पहिल्या षटकात इतक्या अतिरिक्त धावा दिल्या आहेत.
Most balls bowled in an ODI over for 🇮🇳
— All Cricket Records (@Cric_records45) February 23, 2025
11 : Md Shami vs 🇵🇰, Dubai, 2025*
11 : Irfan Pathan vs 🌴, Kingston 2006
11 : Zaheer Khan vs 🇦🇺, Wankhede 2003 pic.twitter.com/coJWrIrJVV
तिनाशे पन्यांगारा च्या नावावर विक्रम : 2004 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात झिम्बाब्वेचा गोलंदाज तिनाशे पन्यांगारा यानं इंग्लंडविरुद्ध पहिला षटक टाकला आणि त्यात 7 वाईड टाकले. त्याच वर्षी म्हणजे 2004 मध्ये, इंग्लंडच्या डॅरेन गॉफनंही वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात 7 वाईड बॉल टाकले होते. 2006 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात मोहाली इथं बांगलादेशविरुद्ध श्रीलंकेच्या चामिंडा वासनं पहिल्याच षटकात 6 वाईड टाकले. यानंतर, आता मोहम्मद शमीचा क्रमांक आला आहे. दुबईमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्याच षटकात त्यानं 5 वाईड बॉल टाकले. जर शमीनं एक किंवा दोन अधिक वाइड बॉल टाकले असते तर तो पहिल्या स्थानावर पोहोचू शकला असता.
Most wide balls bowled in an over in Champions Trophy history:
— All Cricket Records (@Cric_records45) February 23, 2025
7 - Tinashe Panyangara, 2004 🇿🇼
5 - Mohammad Shami, 2025* 🇮🇳
3 - Shane Bond, 2006 🇳🇿
3 - Ian Bradshaw, 2004 🌴 pic.twitter.com/dMQcvFHHwU
5 वाईड टाकणारा पहिला भारतीय गोलंदाज : शमीनं षटकाची सुरुवात चांगली केली, पण पुढचाच चेंडू वाईड झाला आणि त्यानंतर त्यानं या षटकात एकामागून एक 5 वाईड टाकले. यामुळं शमीला षटक पूर्ण करण्यासाठी 11 चेंडू टाकावे लागले आणि त्यामुळं पाकिस्तानला चांगली सुरुवात मिळाली. जरी त्या षटकातून फक्त 6 धावा झाल्या तरी, पाकिस्तानी सलामीवीर कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली असल्याचं दिसून आलं नाही. यासह, शमी वनडे क्रिकेटमध्ये एका षटकात 5 वाईड टाकणारा पहिला भारतीय गोलंदाज बनला. तसंच तो वनडे सामन्यात 11 चेंडूंचं षटक टाकणारा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. त्याच्या आधी झहीर खान आणि इरफान पठाण यांनीही प्रत्येकी 11 चेंडूंचं षटक टाकलं होतं.
Accuracy 🔥
— BCCI (@BCCI) February 23, 2025
Axar Patel with a direct hit to earn the second wicket for #TeamIndia 👏 🎯
Updates ▶️ https://t.co/llR6bWz3Pl#PAKvIND | #ChampionsTrophy | @akshar2026 pic.twitter.com/cHb0iS2kaQ
हेही वाचा :