पुणे : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पाचवा सामना दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघात खेळवण्यात आला. क्रीडा जगतातील सर्वात मोठ्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 6 विकेटनं पराभव केला आहे. या विजयासह भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघानं विजय प्राप्त केल्यानंतर पुण्यातील गुडलक चौक इथं मोठ्या प्रमाणात तरुणांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला. यावेळी तरुणांनी हातात तिरंगा घेत,किंग कोहली याचे फोटो हातात घेत ढोल ताशा वाजवत फटाके फोडत भारत माता की जयघोषात जल्लोष साजरा केला.
भारतानं पाकिस्तानला चारली धूळ; पुण्यात ढोल-ताशा वाजवत चाहत्यांचा जल्लोष : भारतानं पाकिस्तानला धूळ चारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली. या विजयानंतर राज्यभरात नागरिकांनी जल्लोष साजरा केला. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पाचवा सामना दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघात खेळवण्यात आला. क्रीडा जगतातील सर्वात मोठ्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 6 विकेटनं पराभव केला. या विजयासह भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.
नाशिकमध्ये साजरी झाली दिवाळी : भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. भारताने पाकिस्तानचा सहा गडी राखून दणदणीत विजय मिळवत पाकिस्तानला बाहेरचा रस्ता दाखवला. पाकिस्तानचं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. या विजयाचा जल्लोष नाशिककरांनी साजरा केला, शहरातील अनेक हॉटेल्समध्ये लावण्यात आलेल्या एलईडी स्क्रीनवर क्रिकेट प्रेमींनी हा सामना बघितला. विराट कोहलीने विजयाचा चौकार मारल्यानंतर क्रिकेटप्रेमींनी एकच जल्लोष केला. ठिकठिकाणी करण्यात आलेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीमुळं नाशिकमध्ये दिवाळी साजरी झाली.
कोहलीचं चॅम्पियन्स ट्रॉफीत पहिलं शतक : विराट कोहलीनं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात पहिलंच शतक झळकावलं आहे. याआधी त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शतक झळकावता आलं नव्हतं. त्यानं या सामन्यात 111 चेंडूत 100 धावा केल्या, ज्यात 7 चौकारांचा समावेश होता. त्याच्या फलंदाजीसमोर पाकिस्तानी गोलंदाज टिकू शकले नाहीत. शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रौफ यांना चांगली कामगिरी करण्यात अपयश आलं. परिणामी भारताचा विजय सुकर झाला.
कोहली आणि अय्यर यांची चांगली फलंदाजी : रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारतीय संघाला जलद सुरुवात दिली. रोहितनं 15 चेंडूत 20 धावा केल्या. त्याच्याशिवाय शुभमन गिलनं 46 धावा केल्या. विराट कोहली भारतीय संघासाठी सर्वात मोठा हिरो ठरला आणि त्यानं नाबाद 100 धावा केल्या. त्याला श्रेयस अय्यरनं चांगली साथ दिली ज्यानं 56 धावांचं शानदार अर्धशतक झळकावलं. या खेळाडूंमुळंच भारतीय संघ सामना जिंकण्यात यशस्वी झाला. कोहली आणि अय्यर यांच्याविरुद्ध पाकिस्तानी गोलंदाज मोठे अपयशी ठरले आणि त्यांना चांगली कामगिरी करता आली नाही. या दोन्ही फलंदाजांनी अतिशय काळजीपूर्वक फलंदाजी केली आणि धावा करण्यात कोणतीही घाई दाखवली नाही.
हेही वाचा :