रावळपिंडी BAN vs NZ 6th Match Live Streaming : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा सहावा सामना आज 24 फेब्रुवारी रोजी बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता रावळपिंडीतील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
Can New Zealand punch their ticket into the #ChampionsTrophy semi-finals or will Bangladesh keep their campaign alive? 🤔
— ICC (@ICC) February 24, 2025
How to watch 👉 https://t.co/S0poKnwS4p pic.twitter.com/nWAx8CKFF3
दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना : हा ग्रुप अ चा चौथा सामना असेल. दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. बांगलादेशला पहिल्या सामन्यात टीम इंडियाविरुद्ध 6 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला. अशा परिस्थितीत बांगलादेशसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. दुसरीकडे, कीवी संघ सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडनं पाकिस्तानचा 60 धावांनी पराभव केला. अशा परिस्थितीत, ते बांगलादेशविरुद्ध मोठा विजय नोंदवण्याच्या इराद्यानं मैदानात उतरतील. परिणामी दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळेल. तसंच या सामन्यावर पाकिस्तानचही लक्ष असेल, कारण त्यांनी स्पर्धेतील आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी या सामन्यात बांगलादेशनं विजय मिळवणं गरजेचं आहे. जर न्यूझीलंडनं हा सामना जिंकला तर पाकिस्तान पुर्णपणे स्पर्धेच्या बाहेर पडेल.
Bangladesh are all geared up for their crucial #ChampionsTrophy fixture against New Zealand 🇧🇩#BANvNZ pic.twitter.com/2wKcyh5EaJ
— ICC (@ICC) February 23, 2025
रावळपिंडीची खेळपट्टी कशी असेल : बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. जिथं फलंदाजांकडून चांगली कामगिरी अपेक्षित असते. या मैदानावर शेवटचा वनडे सामना 2023 मध्ये खेळला गेला होता. जेव्हा पाकिस्ताननं न्यूझीलंडविरुद्ध दोन सामने खेळले. दोन्ही सामने हाय स्कोअरिंग होते. पहिल्या सामन्यात पाकिस्ताननं ब्लॅक कॅप्सविरुद्ध 289 धावांचा पाठलाग केला, तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी 337 धावांचा मोठा आकडा गाठला. या मैदानावर नवीन चेंडू वापरताना वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. पण एकदा फलंदाज स्थिरावला की तो मोठी खेळी खेळू शकतो. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
The Black Caps are ready to take on Bangladesh with a semi-final berth at stake.#ChampionsTrophy #BANvNZ pic.twitter.com/DHEJGcNPu4
— ICC (@ICC) February 23, 2025
वनडे सामन्यांचा रेकॉर्ड कसा : मीडिया रिपोर्ट्सनुसार, रावळपिंडीतील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत एकूण 26 वनडे सामने खेळले गेले आहेत. ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं 11 वेळा विजय मिळवला आहे, तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघानं 14 वेळा विजय मिळवला आहे. याशिवाय एक सामना बरोबरीत सुटला आहे.
The Champions Trophy starts with a win! Wickets shared across Will O’Rourke (3-47), Mitchell Santner (3-66), Matt Henry (2-25), Nathan Smith (1-20) and Michael Bracewell (1-38) to bowl the hosts out for 240. Catch up on all scores | https://t.co/0pC37HtJtv 📲 #ChampionsTrophy pic.twitter.com/rLMx9MUZKn
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 19, 2025
दोन्ही संघांची हेड-टू-हेड रेकॉर्ड : वनडे स्वरुपातील दोन्ही संघांच्या आकडेवारीबद्दल बोललो तर बांगलादेश आणि न्यूझीलंड आतापर्यंत 45 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. आतापर्यंत यात न्यूझीलंडचं पूर्ण वर्चस्व दिसून आलं आहे. किवी संघानं 45 पैकी 33 सामने जिंकले आहेत. बांगलादेशनं फक्त 11 सामने जिंकले आहेत आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही. त्याच वेळी, जर आपण चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल बोललो तर, या स्पर्धेत बांगलादेश आणि न्यूझीलंड दोनदा आमनेसामने आले आहेत, जिथं दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. तसंच जर आपण गेल्या पाच वनडे सामन्यांबद्दल बोललो तर तिथंही न्यूझीलंडने बांगलादेशवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले आहे. या पाचपैकी कीवी संघानं चार तर बांगलादेशनं एक सामना जिंकला आहे. ही आकडेवारी पाहिल्यानंतर असं म्हणता येईल की जेव्हा दोन्ही संघ रावळपिंडी स्टेडियमवर एकमेकांसमोर येतील तेव्हा न्यूझीलंड हा सामना जिंकण्याचा प्रबळ दावेदार असेल.
ICC Champions Trophy 2025
— Bangladesh Cricket (@BCBtigers) February 23, 2025
Bangladesh 🆚 New Zealand | Rawalpindi
24 February 2025 | 3:00 PM (BST)
PC: ICC/Getty#BCB #Cricket #BDCricket #ChampionsTrophy #BANvNZ pic.twitter.com/AIvV69TDIU
बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा सहावा सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा सहावा सामना 24 फेब्रुवारी (सोमवार) रोजी रावळपिंडी येथील रावळपिंडी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक दुपारी 02:00 वाजता होईल.
Up next: Bangladesh in Rawalpindi on Monday 🏏 #ChampionsTrophy #CricketNation pic.twitter.com/bdbkaVe4YL
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 21, 2025
बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा सहावा सामना कुठं आणि कसा पहावा?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे भारतात अधिकृत प्रसारण हक्क जिओस्टार नेटवर्ककडे आहेत. चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर विविध प्रादेशिक भाषांमध्ये बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहू शकतात. याशिवाय, डिजिटल स्ट्रीमिंगचे अधिकार देखील जिओस्टार नेटवर्ककडे आहेत आणि सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर फ्रीमध्ये उपलब्ध असेल.
Training under lights in Islamabad 🏏 #ChampionsTrophy #CricketNation pic.twitter.com/BfDAxz3dkt
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 23, 2025
सामन्यासाठी दोन्ही संघ :
बांगलादेश : सौम्य सरकार, तन्जीद हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मुशफिकुर रहीम, तौहीद हृदयॉय, जकार अली (यष्टीरक्षक), महमुदुल्लाह, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजूर रहमान.
न्यूझीलंड : विल यंग, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, विल्यम ओ'रोर्क
हेही वाचा :