दुबई Scenario For Pakistan : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पाचव्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा सामना पाकिस्तानशी झाला. 23 फेब्रुवारी (रविवार) रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघानं पाकिस्तानवर सहा विकेट्सनं विजय मिळवला. भारताच्या विजयाचा नायक विराट कोहली होता, ज्यानं नाबाद शतक (100) झळकावलं. या विजयासह, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं उपांत्य फेरीतील आपलं स्थान जवळपास निश्चित केलं आहे. तर पाकिस्तानचं आव्हानं संपल्यात जमा आहे.
19th Feb - Champions Trophy started.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 24, 2025
24th Feb - Pakistan on the verge of getting knocked out.
THE HOSTS PAKISTAN WILL BE KICKED OUT OF CT IF NEW ZEALAND BEAT BANGLADESH TONIGHT. 🤯 pic.twitter.com/wi7XwwRoL9
न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेस सामन्यावर निर्भर : भारताविरुद्ध झालेल्या पराभवामुळं पाकिस्तानी संघाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यता खूपच कमी झाली आहे. मात्र पाकिस्तान संघ स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर पडलेला नाही. सोमवारी (24 फेब्रुवारी) रावळपिंडी इथं न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. जर न्यूझीलंड संघ बांगलादेशविरुद्ध जिंकला तर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडेल. बांगलादेशवर विजय मिळवल्यास न्यूझीलंडसह भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित होईल. तसंच न्यूझीलंड-बांगलादेश सामना जरी वाया गेला तरी पाकिस्तानी संघ स्पर्धेबाहेर पडेल हे निश्चित आहे.
PAKISTAN IN DEEP TROUBLE!
— All Cricket Records (@Cric_records45) February 23, 2025
If New Zealand beat Bangladesh tomorrow, defending champions Pakistan will be eliminated from the Champions Trophy 2025. pic.twitter.com/gBULDBQoi7
इतर संघांच्या निकालावर अवलंबून : मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी इतर निकालांवर अवलंबून राहावं लागेल. याशिवाय, त्याला नशिबाचीही साथ हवी आहे. पाकिस्तानला आशा करावी लागेल की बांगलादेश संघ न्यूझीलंडला हरवेल. मग पाकिस्तानी संघानं शेवटच्या सामन्यात बांगलादेशला मोठ्या फरकानं हरवलं पाहिजे. तसंच न्यूझीलंड संघाला भारताकडून हरायला हवं. अशा परिस्थितीत पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांचे प्रत्येकी दोन गुण समान असतील. अशा परिस्थितीत, गट अ मधील दुसऱ्या उपांत्य फेरीतील संघाचा निर्णय नेट रन रेटच्या आधारे घेतला जाईल. एक गोष्ट निश्चित आहे की पाकिस्तानी संघ आता पॉइंट्स टेबलमध्ये भारताला हरवू शकत नाही. ते जास्तीत जास्त दोन अंकांपर्यंत जाऊ शकते.
Virat Kohli at his absolute best as India make it two wins from two in the #ChampionsTrophy 🔥#PAKvIND ✍️: https://t.co/O9lMfFTkQy pic.twitter.com/naqYOw8hVw
— ICC (@ICC) February 23, 2025
ग्रुपमध्ये कोणता संघ कोणत्या स्थानावर : ग्रुप-अ मध्ये, भारतीय संघ सध्या दोन सामन्यांत दोन विजयांसह अव्वल स्थानावर आहे. भारताचे 4 गुण आहेत आणि त्यांचा नेट रन रेट 0.647 आहे. तर न्यूझीलंडचा संघ एका सामन्यात एका विजयासह दुसऱ्या स्थानावर आहे. किवी संघाचा नेट रन रेट 1.200 आहे. बांगलादेश तिसऱ्या स्थानावर आहे तर पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांनी आपलं खातं उघडलेलं नाही. परंतु, चांगल्या नेट रन रेटमुळं बांगलादेश गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेशचा नेट रन रेट -0.408 आहे. तर पाकिस्तानचा नेट रन रेट -1.087 आहे.
हेही वाचा :