मुंबई - यूट्यूबर प्राजक्ता कोळी सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. प्राजक्ता 25 फेब्रुवारी रोजी बॉयफ्रेंड वृषांक खनालशी लग्न करणार आहे. तिच्या लग्नातील कार्यक्रमाची सुरुवात 23 फेब्रुवारीपासून झाली. आता तिनं इंस्टाग्रामवर तिच्या मेहंदी सोहळ्यातील सुंदर फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. मेहंदी समारंभात प्राजक्ताच्या डोळ्यात एक वेगळीच चमक पाहायला मिळत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये प्राजक्ता आणि तिचा बॉयफ्रेंड वृषांक हे खूप खुश असल्याचे दिसत आहेत. मेहंदी समारंभात तिच्या घरी देखील खूप आनंदाचे वातावरण असल्याचे दिसत आहे.
प्राजक्ता कोळीच्या मेंहदी समारंभातील फोटो : दरम्यान प्राजक्तानं तिच्या पोस्टमध्ये हार्टसह इमोजी शेअर केला आहे. आता प्राजक्तानं शेअर केलेल्या फोटोवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, 'दोघेही खूप सुंदर एकत्र दिसत आहे.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'मी लग्नामधील नेपाळी विधी पाहण्यासाठी खूप आतुर आहे.' आणखी एकानं लिहिलं, 'यांच्या जोडीला कोणीची नजर लागू नये.' याशिवाय अनेकजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत. प्राजक्ता आणि वृषांक हे दोघेही गेल्या 13 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या जोडप्याचा साखरपुडा हा 2 वर्षांपूर्वी झाला होता.
प्राजक्ता आणि वृषांकबद्दल : फोटोत मेहंदी समारंभात, प्राजक्ता आणि वृषांक एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. तसेच एका फोटोत, वृषांक हा प्राजक्ताच्या गालावर किस घेताना दिसत आहे. काही फोटोत संपूर्ण कुटुंब नाचत आहे. दरम्यान प्राजक्ता ही 'मिसमॅच्ड' या सीरीजमुळे प्रसिद्धीझोतात आली होती. या सीरीजमध्ये तिनं डिंपल आहुजाचं पात्र साकारलं होतं. तसेच तिचं लोकप्रिय मोस्टली सेन युट्यूब चॅनेल देखील आहे. तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. युट्यूबवर प्रसिद्धी मिळल्यानंतर तिनं अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. यामध्ये तिला यश आलं. तसेच तिचा बॉयफ्रेंड वृषांक खनालबद्दल सांगायचं झालं तर तो नेपाळचा असून एक वकील आहे.
हेही वाचा :