नवी दिल्ली : भाजपानं दिल्लीत सरकार सत्ता संपादन करत सरकार स्थापन केलं. आजपासून दिल्लीत आठव्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात होत आहे. नव्यानं निवडून आलेल्या आमदारांना विदानसभेत बसण्यासाठी सीट क्रमांक देण्यात आले आहेत. आज सकाळी अधिवेशनाला सुरुवात होणार असून नायब राज्यपाल व्ही के सक्सेना हे हंगामी अध्यक्षांना शपथ देणार आहेत. त्यानंतर नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यात येणार आहे.
आजपासून दिल्ली विधानसभा अधिवेशनाला सुरुवात : नवनिर्वाचित दिल्ली विधानसभेचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. या अदिवेशनासाठी आमदारांना विधानसभेत बसण्यासाठी जागा क्रमांक देण्यात आले. विधानसभेनं जाहीर केलेल्या आमदारांच्या जागावाटप यादीनुसार नवनिर्वाचित 57 आमदारांना जागा क्रमांक देण्यात आले. मात्र अद्यापही 13 आमदारांनी विजयाचं प्रमाणपत्र सादर न केल्यानं त्यांना जागा क्रमांक देण्यात आलेले नाहीत. आज या आमदारांनी प्रमाणपत्र सादर केल्यानंतर त्यांना जागा क्रमांक वाटप केलं जाणार आहे.
नायब राज्यपाल देतील हंगामी अध्यक्षांना शपथ : आज विधानसभेच्या पहिल्या सत्रात नायब राज्यपाल व्ही के सक्सेना हंगामी अध्यक्षांना शपथ देणार आहेत. हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेणारे पहिले आमदार अरविंदर सिंह लवली असणार आहेत. यानंतर हंगामी अध्यक्ष आमदारांना शपथ देतील. शपथग्रहण झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली कामकाज सुरू होईल. विधानसभेच्या नियमांनुसार सत्ताधारी पक्षाचे आमदार विधानसभा अध्यक्षांच्या उजव्या बाजूला आणि विरोधी पक्षाचे आमदार त्यांच्या डाव्या बाजूला बसतात. नियमांनुसार पहिली जागा मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना देण्यात आली तर दुसरी जागा कॅबिनेट मंत्री प्रवेश वर्मा यांना देण्यात आली. तिसरी जागा ग्रेटर कैलाशच्या आमदार शिखा राय यांना, चौथी जागा नरेलाचे आमदार राजकरण खत्री यांना, पाचवी जागा तिमारपूरचे आमदार सूर्यप्रकाश खत्री यांना आणि सहावी जागा आदर्श नगरचे आमदार राजकुमार भाटिया यांना देण्यात आली आहे.
हेही वाचा :