ETV Bharat / bharat

बोंबला; ड्युटी संपली, लोको पायलट अन् गार्डनं साखळदंडानं रेल्वे बांधली ट्रॅकला, वाहतुकीचा खोळंबा - GOODS TRAIN CHAINED TO TRACKS

ड्युटी संपल्यानंतर लोको पायलट आणि गार्डनं चक्क रेल्वे ट्रॅकला साखळीनं बांधल्याचा धक्कादाय प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी रेल्वे विभागानं चौकशी सुरू केली आहे.

Goods Train Chained To Tracks
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 24, 2025, 2:00 PM IST

पाटणा : आपल्या अनोख्या कहाण्यांनी बिहार कायम देशभरात चर्चेत राहते. आताही बिहारमध्ये एक अनोखी घटना उघडकीस आली आहे. ड्युटी संपल्यानं चक्क रेल्वेचे लोको पायलट अन् गार्डनं रेल्वे साखळदंडानं ट्रॅकला बांधून ठेवली. इतक्यावरच हे पठ्ठे थांबले नाहीत, तर त्यांनी रेल्वे ट्रॅकवर बांधून घरी पोबारा केला. त्यामुळे इतर रेल्वे गाड्यांना दुसऱ्या प्लॅटफार्मवर लावाव्या लागल्या. ही घटना बिहारमधील भागलपूर पाटणा रेल्वे मार्गावरील बाढ रेल्वे स्थानकावर घडली. या घटनेनं रेल्वे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. रेल्वे प्रशासनानं आता या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

Goods Train Chained To Tracks
साखळदंडानं रेल्वे बांधली ट्रॅकला (ETV Bharat)

स्थानकावर साखळदंडानं बांधली रेल्वे : बिहारमधील भागलपूर-पाटणा रेल्वे मार्गावरील बाढ रेल्वे स्थानक सध्या देशभर चर्चेत आलं आहे. या स्थानकावर लोको पायलट आणि गार्डनं मालगाडी चक्क साखळदंडानं ट्रॅकवर बांधून ठेवली. आपली आठ तासांची ड्युटी पूर्ण झाल्यानंतर या दोघांनी मालगाडी प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर उभी केली. दोघंही रेल्वेला साखळदंडांनी बांधून घरी निघून गेले.

Goods Train Chained To Tracks
बाढ रेल्वे स्थानक (ETV Bharat)

चोरी करू नये म्हणून सुरक्षेसाठी बांधली रेल्वे : बाढ रेल्वे स्थानकावर ही मालगाडी शनिवारी संध्याकाळी 4 वाजता पोहोचली. मालगाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर पोहोचल्यानंतर चालक आणि गार्डनं ट्रेन थांबवली. त्यानंतर तिला साखळदंडानं बाधून हे दोगंही तिथून निघून गेले. याबाबत या रेल्वे कर्मचाऱ्यांना विचारणा करण्यात आली. यावेळी त्यांनी सांगितले की, सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वेला साखळ्यांनी बांधण्यात आलं.

वाहतुकीचा खोळंबा, गाड्यांच्या प्लॅटफॉर्ममध्ये बदल : लोको पायलट आणि गार्डनं मालगाडी मुख्य मार्गावर आणून बांधली. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर येणाऱ्या इतर गाड्यांचे प्लॅटफॉर्म बदलण्यात आले. त्यांना दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर आणण्यात आलं. बाढ रेल्वे स्थानकावर आलेल्या प्रवाशांनाही या घटनेमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मात्र याबाबत रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणतंही अधिकृत उत्तर देण्यात आलेलं नाही.

ब्रेक व्हॅनच्या चाकांना बांधला साखळदंड : रेल्वेच्या लोको पायलटनं मालगाडीच्या ब्रेक व्हॅनच्या चाकांना साखळदंडानं बांधण्यात आलं. "आठ तासांची ड्युटी पूर्ण केल्यानंतर रेल्वे बाढ स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर उभी करण्यात आली. सुरक्षितता लक्षात घेऊन, ट्रेनच्या चाकांना साखळी बांधण्यात आली" असं मालगाडीच्या लोको पायलटनं यावेळी सांगितलं.

हेही वाचा :

  1. केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील रेल्वेला काय मिळालं? मुंबईतील लोकलला काय झाला फायदा? जाणून घ्या सविस्तर
  2. रेल्वे रुळावर उभे राहून सेल्फी घेणं बेतलं तरुणाच्या जीवावर; धावत्या एक्सप्रेसची धडक लागून जागीच मृत्यू
  3. मध्य रेल्वेची वीज खर्चात मोठी कपात, 'ओपन अ‍ॅक्सेस'मुळे 6 हजार 5 कोटींची बचत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.