मुंबई - लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. या चित्रपटातील दमदार अभिनयाबद्दल विकी कौशलचं खूप कौतुक केलं जात आहे. चित्रपटातील विकीच्या अभिनयानं प्रेक्षकांना रडायला भाग पाडले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील चित्रपटाचे कौतुक केलं आहे. 'छावा' प्रदर्शित झाल्यापासून दररोज बॉक्स ऑफिसवर मोठे रेकॉर्ड करत आहे. 'छावा' चित्रपट 2025चा 200 कोटींचा टप्पा ओलांडणारा पहिला चित्रपट ठरला आहे. आता 'छावा' प्रदर्शित होऊन 9 दिवस झाले आहेत. आता आम्ही या चित्रपटानं 9 दिवसात किती कमाई केली, याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.
'छावा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन : विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'छावा' चित्रपट प्रेक्षकांना खूप पसंत पडला. 'छावा'च्या कलेक्शनकडे पाहता असे दिसते की येणाऱ्या काळात हा चित्रपट अधिक कमाई करेल. फक्त विकीच नाही तर मुघल सम्राट औरंगजेबाची भूमिका साकारणारे अक्षय खन्नाचं देखील कौतुक केलं जात आहे. याशिवाय रश्मिका मंदान्ना, आशुतोष राणा यांसारख्या कलाकारांचा देखील अभिनय अनेकांना आवडला आहे. आता 'छावा' चित्रपटाचं शनिवारचं कलेक्शन समोर आलं आहे. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या अहवालानुसार, 9 व्या दिवशी या चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 44 कोटी रुपये कमावले आहेत. आता या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 286.75 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. हा चित्रपट देशांतर्गत 300 कोटीची रुपये गाठण्यासाठी सज्ज आहे. तसेच जगभरातील कलेक्शनचे आकडे अद्याप उघड झालेले नाहीत, मात्र 'छावा'नं 8 दिवसांत जगभरात 338.75 कोटी रुपये कमावले आहेत. 9व्या दिवशी चित्रपट सुमारे 400 कोटी रुपये अंदाजे कमाई करेल.
डे इंडिया नेट कलेक्शनमध्ये बदल
दिवस 1 पहिला शुक्रवार 31 कोटी
दिवस 2 पहिला शनिवार 37 कोटी
दिवस 3 पहिला रविवार 48.5 कोटी
दिवस 4 पहिला सोमवार 24 कोटी
दिवस 5 पहिला मंगळवार 25.25 कोटी
दिवस 6 पहिला बुधवार 32 कोटी
दिवस 7 पहिला गुरुवार 21.5 कोटी
पहिल्या आठवड्याचा संग्रह 219.25 कोटी
आठवा दिवस दुसरा शुक्रवार 23.5 कोटी
दिवस 9 दुसरा शनिवार 44 कोटी अंदाजे डेटा
एकूण कमाई 286.75 कोटी
हेही वाचा :