हैदराबाद : रॉयल एनफील्डची पहिली इलेक्ट्रिक बाईक रॉयल एनफील्ड फ्लाइंग फ्ली भारतात सादर करण्यात आली. ही मोटसायकल पहिल्यांदा EICMA 2024 मोटर शोमध्ये सादर करण्यात आली होती. या मोटरसायकलला एक अनोखे रेट्रो-रोडस्टर डिझाइन देण्यात आलं आहे. ही इलेक्ट्रिक मोटरसायकल 250-300 सीसी आयसीई बाईकच्या बरोबरीची असेल अशी अपेक्षा आहे. रॉयल एनफील्ड फ्लाइंग एफआयए 2025 च्या अखेरीस भारतात लाँच होऊ शकते.
डिझाइन
रॉयल एनफील्ड फ्लाइंग फ्ली सी6 मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील फ्लाइंग फ्ली मोटरसायकलपासून प्रेरित एक अद्वितीय रेट्रो-रोडस्टर डिझाइन आहे. मोटरसायकलमध्ये गोल एलईडी इंडिकेटरसह एलईडी हेडलाइट आहे. गर्डर फोर्कमुळं ती आधुनिक बाइक्समध्ये वेगळी दिसतेय. त्यात एक पातळ पाण्याच्या थेंबासारखा "टँक" आणि एक स्कूप केलेलं सिंगल-पीस सीट आहे. यामध्ये बॅटरी पॅक टाकीखाली दिला आहे. त्यात कूलिंग फिन देखील दिले आहेत. मागील बाजूस, ब्रेस्ड रियर फेंडर, फेंडर-माउंटेड टेल लाईट आणि इंडिकेटर्ससह एक उत्तम लूक देण्यात आला आहे.
रॉयल एनफील्ड फ्लाइंग फ्ली सी6
रॉयल एनफिल्डनं त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक मोटरसायकलचे स्पेसिफिकेशन्स उघड केलेले नाहीत. मात्र, ही इलेक्ट्रिक मोटरसायकल 250-300 सीसी आयसीई बाईकइतकी पावर देण्याची शक्यता आहे. त्याच्या सस्पेंशन युनिटमध्ये गर्डर फोर्क आणि मोनोशॉकचा समावेश आहे. बाईकच्या दोन्ही बाजूला डिस्क ब्रेक आणि 19-इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.
वैशिष्ट्ये
रॉयल एनफील्ड फ्लाइंग फ्ली सी6 मध्ये रॉयल एनफील्ड हिमालयन 450 प्रमाणेच एक गोल टीएफटी इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे, जो वेग, ओडोमीटर, ट्रिप मीटर, चार्ज स्थिती, श्रेणी आणि बरंच काही दर्शवितो. त्याचा कन्सोल स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीला देखील सपोर्ट करतो. फ्लाइंग फ्लीमध्ये चावीशिवाय इग्निशन आणि टाकीवर स्थित आपत्कालीन सुरक्षा स्विच देखील आहे.
किंमत आणि प्रतिस्पर्धी
रॉयल एनफील्ड फ्लाइंग फ्ली C6 ची भारतीय बाजारपेठेत एक्स-शोरूम किंमत सुमारे 2.5 लाख रुपये असण्याची अपेक्षा आहे. ही दुचाकी तामिळनाडूतील वल्लम वडागल येथील रॉयल एनफील्डच्या ईव्ही कारखान्यात तयार केली जाईल. या इलेक्ट्रिक बाईकसाठी थेट स्पर्धा नाही, परंतु लाँच झाल्यानंतर, ती ओला रोडस्टर प्रो आणि अल्ट्राव्हायोलेट F77 शी स्पर्धा करू शकते.
हे वाचलंत का :