महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

"देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांचे... "; मनोज जरांगे पाटलांचा पुन्हा एकदा निशाणा

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या दौऱ्यास आजपासून सुरुवात झालीय. अंतरवाली सराटी येथून निघाल्यानंतर जरांगे पाटील बीड जिल्ह्यातील वानगाव या ठिकाणी दाखल झाले होते. यावेळी मराठा समाज बांधवांना त्यांनी मार्गदर्शन केलं. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा इशारा दिलाय.

Manoj Jarange Patil On  Devendra Fadnavis
मनोज जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 3, 2024, 5:22 PM IST

प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील

बीड Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर आता ते पुन्हा दौऱ्यासाठी बाहेर पडले आहेत. त्यांची पहिलीच बैठक बीडमधील वाणगाव फाटा येथे पार पडली. यावेळी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुन्हा एकदा इशारा दिलाय. ते म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस हे पोलिसांचे कान फुकत आहेत. आमचे बॅनर, पोस्टर काढण्याच्या सूचना देत आहेत. पण निवडणुकीत तुम्हालाही आमच्या गावात बॅनर लावायचं आहे, आमच्या घराला पोम्प्लेट चिटकवायचं आहे, आता ते आम्ही सहन करणार नाही."

पुढाऱ्यांनी आमच्या दारात यायचं नाही : यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, "यापुढे पुढाऱ्यांनी आमच्या दारात यायचं नाही, अशी मोहीम आम्ही राज्यभर चालवणार आहोत. अगदी गाड्यांवर देखील हेच घोषवाक्य लिहिलं जाणार आहे. माझ्या आंदोलनामागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे असल्याचा आरोप करतात आणि दुसरीकडं त्याच शरद पवार यांना अंतरवालीतून रस्ता बदलून जावं लागलं असं सांगतात. मराठा समाजाविषयी त्यांच्या मनातच द्वेष आहे, तो द्वेष आता सर्व समाजाने पाहिला आहे. मी समाजाशी प्रामाणिक आहे, परंतु माझ्या विरोधात सर्वजण एकत्र आले आहेत."

“देवेंद्र फडणवीस पोलिसांचे कान फुंकत आहेत. माझ्याविरोधात एसआयटी चौकशी लावली आहे. पण मी इंचभरही मागे हटणार नाही. मी चौकशीसाठी तयार आहे. फडणवीस यांनी मला आत टाकून दाखवावेच, त्यानंतर भावनिक लाट काय असते? हे त्यांना दिसेल" - मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलक

पुन्हा एकदा आंदोलन : "माझी एकच मागणी आहे की, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, अन्यथा आम्ही पुन्हा एकदा आंदोलन करू. बीडमध्ये मराठा समाजानं लोकसभा निवडणुकीत अनेक उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतलाय. परंतु, त्याच्यावर मी काही बोलणार नाही. तो निर्णय समाजानं घेतला आहे," असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

हेही वाचा -

  1. भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; संविधान भेट देत केली 'ही' मागणी
  2. नाद खुळा; 'या' जिल्ह्यातील मराठा बांधव लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून दाखल करणार उमेदवारी अर्ज
  3. हाताला लावलेली सलाईन काढून मनोज जरांगे थेट अंतरवालीकडं निघाले, मात्र...; संभाजीनगरात काय घडलं?

ABOUT THE AUTHOR

...view details