मुंबई - 2016 मध्ये प्रदर्शित झालेला 'सनम तेरी कसम' पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. 9 वर्षांनंतर, हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर आता अनेक प्रेक्षक खुश आहेत. सध्या हा चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. 2016 मध्ये प्रदर्शित झालेला सनम तेरी कसम' चित्रपट रुपेरी पडद्यावर फ्लॉप झाला होता, मात्र आता याला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटानं पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर दोन दिवसांत 9 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा रोमँटिक चित्रपट 7 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाल्यानंतर अनेकजण पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहे.
'सनम तेरी कसम' पुन्हा प्रदर्शित : आता चित्रपटातील मुख्य अभिनेत्री मावरा होकेननं स्वतः आश्चर्य व्यक्त केलं आहे. मावरा होकेननं 'सनम तेरी कसम'ला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं पाहून आनंद व्यक्त केला आहे. तिनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केली आहे. यामध्ये 'सनम तेरी कसम' पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांची गर्दी आणि एक सीन दिसत आहे. या व्हिडिओत प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची क्रेझ स्पष्टपणे दिसून येत आहे. सध्या पाकिस्तानात बसलेल्या नवविवाहित वधू मावराच्या आनंदाला सीमा राहिली नाही. तिनं व्हिडिओ शेअर करताना लिहिलं, 'मित्रांनो, हे आश्चर्यकारक आहे. मी ऐकलंय की, काही रेकॉर्ड बनवत आहे. सगळीकडे हाऊसफुल्ल आहे. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आणि भरपूर प्रेम.'
मावरा होकेनचं लग्न : मावरा होकेनच्या पोस्टवरून एक गोष्ट स्पष्ट होतं आहे की, तिच्या चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे ती खूप खुश आहे. मावरा ही एक प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आहे. तिला 'सनम तेरी कसम' चित्रपटमधून एक ओळख मिळाली. हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. मावरा 'सनम तेरी कसम'मध्ये 'सरस्वती उर्फ सरू'च्या भूमिकेत दिसली आहे. तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे भारतीय प्रेक्षकांनी खूप कौतुक केले आहे. याच कारणामुळे फक्त पाकिस्तानातच नाही तर भारतातही तिचे खूप चाहते आहेत. या चित्रपटात मावराबरोबर हर्षवर्धन राणे हा मुख्य भूमिकेत दिसला होता. अलीकडेच मावरानं तिचा बॉयफ्रेंड अमीर गिलानीशी लग्न केलं आहे. अमीर मावराबरोबर अनेक पाकिस्तानी शोमध्ये दिसला आहे.
हेही वाचा :