Benefits Of Eating Ajwain: स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असलेला ओवा हा बहुगुणकारी घटक आहे. आयुर्वेदात त्याचे अनेक फायदे सांगितले आहे. लोकं विविध पद्धतीनं ओव्याचं सेवन करतात. कुणी मुखवास म्हणून तर कुणी एखाद्या पदार्थाला टेस्ट प्रदान करण्यासाठी त्याचा उपयोग करतात. सर्दी आणि खोकल्यावर ओवा अंत्यत फायदेशीर आहे. यात अँटिव्हायरल आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत. जे अनेक आजारांपासून शरीराचं संरक्षण करतात. मासिक पाळीच्या समस्या टाळण्यास देखील ओवा मदत करते. तसंच गॅस, अॅसिडीटी आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर करते. ओव्यामध्ये कॅल्शियम, लोक, पोटॅशियम, आयोडीन, कार्बोहायड्रेट, कॅरोटीन मुबलक प्रमाणात आढळते. चला जाणून घेऊया ओवा खाण्याचे फायदे.
- पचनास मदत करते: ओवा पोटदुखी, पोटातील पेटके, जळजळ आणि अपचन यासारख्या पचनासंबंधित समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करते. ओवा पचनसंस्थेला शांत करते आणि जठरतंत्रांच्या स्नायूंना आराम देण्यास मदत करते. तसंच आतड्याच्या आणि पोटामधील जखमा बरे करण्यासाठी फायदेशीर आहे.
- रक्तदाब कमी करते: फायटोमेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात उंदरांना ओव्याच्या अर्क दिल्यानं त्यांचा रक्तदाब कमी झाल्याचे दिसून आले. थायमचे गुणधर्म, विशेषतः थायमॉल, रक्तवाहिन्यांना आराम देतात आणि रक्तप्रवाह सुरळीत करतात. संशोधनातून असं दिसून आलं आहे की ओव्याचा अर्क कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स आणि वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करू शकतो, तर चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवू शकतो. हे गुणधर्म रक्तवाहिन्यांमधील अडथळे टाळते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते.
- खोकला आणि सर्दीवर उपाय: ओवा श्वसनाच्या समस्यांसाठी नैसर्गिक कफनाशक म्हणून काम करतो. ओवा एक अॅंटी कफ एजंट आहे. ओवा मिसळलेला चहा घेतल्यास श्वसनमार्गातील श्लेष्मा काढून टाकला जातो आणि खोकला आणि नाक बंद होणे यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. आंतरराष्ट्रीय संशोधनानुसार, ओवा बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे.
- तोंडाचे आरोग्य: ओव्यामधील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक-विरोधी गुणधर्म तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. हे तोंडाच्या संसर्गाशी लढण्यास आणि दातदुखी कमी करण्यास मदत करते.
- वेदना कमी करते: बायोकेमिस्ट्री रिसर्च इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की ओव्यातील दाहक-विरोधी गुणधर्म संधिवातामध्ये होण्याऱ्या वेदना कमी करण्यास मदत करतात. याकरिता एका ग्लासमध्ये ओवा रात्रभर भिजू घाला आणि सकाळी उठल्यावर ते पाणी प्या. किंवा कोमट पाण्यात ओवा पावडर मिळून प्या.
- वजन कमी करते: ओवा पचन आणि चयापचय सुधारते. परिणामी वजन कमी करण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, अँटीमायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म मुरुम, त्वचेवर पुरळ इत्यादींना प्रतिबंधित करतात आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. त्याशिवाय, ओवा हार्मोन्स संतुलित करून मासिक पाळी नियमित करण्यास मदत करते. मासिक पाळीच्या दरम्यान ओवा घेण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा.
- दुष्परिणाम: ओवा घेणे सुरक्षित असला तरी, जास्त प्रमाणात ओवा खाल्याने दुष्परिणाम होऊ शकतात. जसे की चक्कर येणे आणि मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात. गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय ओव्याचं सेवन करू नये.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC4096002/