ETV Bharat / health-and-lifestyle

खुशखबर! अखेर लिम्पी रोगाच्या लसीला CDSCO कडून मान्यता; लवकरच होणार उपलब्ध - LUMPY SKIN DISEASE VACCINE

बायोव्हेटच्या "बायोलंपिव्हॅक्सिन" लसीला सीडीएससीओ कडून परवाना मिळाला आहे. ही भारत तसंच जगातील पहिली DIVA मार्कर लस आहे.

LUMPY SKIN DISEASE VACCINE  BIOLUMPIVAXIN  BIOVET A BHARAT BIOTECH GROUP COMP  BIOLUMPIVAXIN GETS LICENSE
बायोलंपिव्हॅक्सिन (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Feb 10, 2025, 8:06 PM IST

LUMPY SKIN DISEASE VACCINE: सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने सोमवारी जनावरामधील लम्पी स्किन डिसीज (LSD) साठी भारत बायोटेक ग्रुपच्या बायोव्हेटने विकसित केलेली देशातील पहिली लस, बायोलम्पीव्हॅक्सिनला सेंट्रल ड्रग स्टॅंडर्ड्स कंट्रोल ऑर्गेनायझेशन कडून परवाना मिळाला आहे. लवकरच ही लस लॉच होणार आहे.

कर्नाटकातील मल्लूर येथील एक नाविन्यपूर्ण प्राणी आरोग्य लस उत्पादन कंपनी बायोव्हेटने याबद्दल एक निवदेन जारी केलं त्यात ते म्हणाले की, बायोलॅम्पिव्हाक्सिन ही भारतातील पहिली एलएसडी लस आहे आणि ती फायदेशीर आहे.

  • लम्पी स्किन डिसीज म्हणजे काय?

लम्पी हा गुरांमध्ये पोक्सविरिडे विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार गोवंश आणि म्हैसला होतो. यामध्ये गुरांना ताप येतो तसंच त्वचेवर आणि श्लेश्मल त्वचेवर फोडे येतात. तसंच जनावरांच्या तोंडातून, नाकातून तसंच डोळ्यातू पाणी येतो. यामुळे जणावरांना चारा खाण्यास त्रास होतो. 2022 मध्ये भारतात एलएसडीच्या प्रादुर्भावादरम्यान, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब आणि जम्मू आणि काश्मीर सारख्या राज्यांमध्ये जणावर आजारी पडण्याचे प्रमाण 80% पर्यंत पोहोचले आणि मृत्यूचे प्रमाण 67% पर्यंत पोहोचले होते. यामुळे अंदाजे 18,337.76 कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आणि दुग्ध उत्पादनात 26% घट झाली, ज्यामुळे दुग्ध उद्योग आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला लक्षणीय नुकसान झाले. भारतात, एलएसडी दुग्ध उत्पादकतेसाठी एक मोठा धोका म्हणून उदयास आला आहे, ज्याचा लाखो शेतकऱ्यांवर परिणाम होत आहे.

एलएसडी पहिल्यांदा 1929 मध्ये आफ्रिकेतील झांबियामध्ये आढळून आला. 1988 मध्ये इजिप्त आणि १९८९ मध्ये इस्रायलमध्ये ट्रान्सकॉन्टिनेंटल पसरण्यापूर्वी अनेक दशकांपर्यंत हा आजार आफ्रिकेपुरता मर्यादित राहिला. गेल्या काही वर्षांत, एलएसडी विषाणूने मध्य पूर्व, युरोप आणि अलिकडे भारतासह अनेक आशियाई देशांमध्ये आपली भौगोलिक व्याप्ती वाढवली आहे. भारतात पहिला पुष्टी झालेला प्रादुर्भाव 2019 मध्ये झाला आणि तेव्हापासून, एलएसडी विषाणू अनेक राज्यांमध्ये वेगाने पसरण्यास सुरुवात झाली. ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे आणि दूध उत्पादनात घट झाली आहे. गेल्या दोन वर्षांत, देशभरात एलएसडीमुळे सुमारे 2,00,000 गुरे मृत्युमुखी पडली आहेत आणि लाखो गुरांनी त्यांची दूध उत्पादन क्षमता गमावली आहे.

  • एलएसडीसाठी जगातील एकमेव मार्कर लस

लवकरच लाँच होणारी BIOLUMPIVAXIN® ही LSD साठी जगातील एकमेव मार्कर लस आहे. ही DIVA संकल्पनेसह नैसर्गिकरित्या संक्रमित आणि लसीकरण केलेल्या प्राण्यांमध्ये सेरोलॉजिकल फरक करण्यास सक्षम करते आणि उच्च सुरक्षितता आणि परिणामकारकता प्रदान करते.

या लसीची गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकता आयसीएआर-एनआरसीई आणि भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था (आयव्हीआरआय) येथे तपासण्यात आली आहे, ज्यामुळे ती सर्वोच्च जागतिक मानकांची पूर्तता करते. ही स्वदेशी जिवंत-अ‍ॅटेन्युएटेड मार्कर लस भारत बायोटेकच्या बायोव्हेटच्या सहकार्याने इंडियन कौन्सिल ऑफ अॅग्रिकल्चर रिसर्च-नॅशनल रिसर्च सेंटर ऑन इक्वाइन्स (आयसीएआर-एनआरसीई), हिसार येथील एलएसडी विषाणू/रांची/1019 लसीच्या प्रकाराचा वापर करून विकसित करण्यात आली आहे. लसीकरणामुळे जणावरांची रोगप्रतिकार शक्ती वाढेल

लस रोगप्रतिकारक शक्तीला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गुरेढोरे आणि म्हशींमध्ये एलएसडी विषाणू संसर्गाविरुद्ध संरक्षण यंत्रणा तयार करण्यास निर्देशित करते. लसीकरण केलेल्या प्राण्यांमध्ये इच्छित प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी 3 ते 4 आठवडे लागू शकतात. म्हणून, सर्व वयोगटातील दुग्धजन्य गुरेढोरे आणि म्हशींना एलएसडी विषाणू संसर्गापासून वाचवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करणे आवश्यक आहे.

  • संशोधन आणि चाचणी: ही लस एनआरसीई येथील शास्त्रज्ञांनी डॉ. नवीन कुमार (संचालक, एनआयव्ही-पुणे) यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बीएन त्रिपाठी (माजी डीडीजी, अ‍ॅनिमल सायन्सेस, आयसीएआर, आता कुलगुरू, एसकेयूएएसटी, जम्मू) यांच्या नेतृत्वाखाली विकसित करण्यात आली. आयसीएआर आणि त्यांच्या शास्त्रज्ञांनी प्राण्यांच्या आरोग्यासाठी या सहयोगी, जागतिक दर्जाच्या लसीच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि महत्त्वाची भूमिका बजावली.
  • प्रीक्लिनिकल अभ्यास: ही लस बाह्य घटकांपासून मुक्त असल्याचे दिसून आले आहे आणि नियंत्रित BSL3 प्राण्यांतील संसर्ग, रोगप्रतिकारक शक्ती आणि संरक्षणावर प्रभावी ठरली आहे. याव्यतिरिक्त, गुरांमध्ये चाचणी केल्यावर विषाणू परत येण्याची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत. महत्त्वाचे म्हणजे, लसीकरण केलेल्या प्राण्यांच्या दूध, वीर्य किंवा इतर शारीरिक मलमूत्रात (जसे की नाक, नेत्र किंवा मलमार्ग) लस विषाणू आढळला नाही.

गेल्या दोन वर्षांत, देशभरात जवळपास 200,000 गुरे मृत्युमुखी पडली आहेत, तर लाखो गुरांनी एलएसडीमुळे त्यांची दूध उत्पादन क्षमता गमावली आहे. बायोम्पिव्हॅक्सिन हे ३ महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या गायी आणि म्हशींना वर्षातून एकदा दिले जाणारे एकच लसीकरण आहे. क्लिनिकल चाचण्यांमध्ये, आयसीएआर-एनआरसीई, हिसार तसंच बायोव्हेट यांनी शेतातील परिस्थितीत हजारो गुरे/म्हशींचे लसीकरण केले आणि ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे आढळून आले. प्रजननक्षम बैल, गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या गायी आणि म्हशींसह सर्व प्रकारच्या प्राण्यांमध्ये ते सुरक्षित आढळले.

डॉ. एला पुढे म्हणतात, "या लसीसाठी सीडीएससीओ परवाना हे पशुवैद्यकीय आरोग्य सेवेमध्ये भारताच्या स्वावलंबी (आत्मनिर्भर भारत) दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, जे आयात केलेल्या लसींवरील अवलंबित्व टाळते."

हेही वाचा

  1. दिलासादायक! ससूनमधील पाच रुग्णांची 'जीबीएस'वर यशस्वी मात; डिस्चार्ज मिळाल्यानंतर म्हणाले...
  2. रूबी हॉल क्लिनिकमध्ये हायटस हर्नियावर रोबोटिक पद्धतीनं यशस्वी शस्त्रक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.