मुंबई : मिर्झापूरमधील अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी शनिवारी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं आहे. त्यांना तिथले वातावरण खूप आध्यात्मिक आणि चांगलं वाटलं. याशिवाय त्यांनी कुटुंबासह महाकुंभमेळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल देखील आनंद व्यक्त केला. त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केल्यानंतर, त्रिपाठी यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, "येथील वातावरण खूप आध्यात्मिक आणि दिव्य आहे. हे खूप छान आहे, मी खूप आनंदी आहे कारण मला त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करण्याची संधी माझ्या कुटुंबासह मिळाली. देवानं आपल्याला या पवित्र ठिकाणी येण्याची ही अद्भुत संधी दिली."
पंकज त्रिपाठी महाकुंभ मेळ्यात : जेव्हा पापाराझीनं त्याच्याशी आणखी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी म्हटलं, "आता आम्हाला जाऊ द्या, कारण खूप रहदारी आहे आणि पोहोचण्यासाठी आम्हाला खूप वेळ लागेल." पंकज त्यांना साध्या जीवनशैलीसाठी ओळखले जाते आणि इथेही ते साध्या लूकमध्ये दिसले. त्याच्याबरोबर त्याची पत्नीही उपस्थित होती. प्रयागराजमध्ये होणारा महाकुंभ खूप खास आहे, कारण हा 144 वर्षांनी एकदा भरणारा मेळा आहे. 45 दिवसांचा महाकुंभ 13 जानेवारी 2025 रोजी सुरू झाला. या महाकुंभ मेळाव्यात भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी भाग घेतला
#WATCH | Prayagraj: Actor Pankaj Tripathi says, " the vibes here are very spiritual. i am feeling very happy as i got the opportunity to take a holy dip in the triveni sangam..." https://t.co/o1lN5WT596 pic.twitter.com/qld8RtqJN8
— ANI (@ANI) February 8, 2025
'या' सेलिब्रिटी देखील महाकुंभामध्ये घेतला भाग : तसेच शुक्रवारी, ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता देखील या पवित्र ठिकाणी पोहोचल्या, त्यांचा अनुभव सांगताना म्हटलं होतं, "मला येथे अनेक वर्षांपासून यायचे होते. हा एक अनोखा अनुभव आहे, अखेर आज मी हा निर्णय घेतला. येथील वातावरण अद्भुत आहे. मी माझ्या आयुष्यात कधीही एवढी मोठी गर्दी पाहिली नाही. सरकारनं आयोजित केलेल्या इतक्या मोठ्या कार्यक्रमानं मी खूप प्रभावित झाले आहे." तसेच अभिनेता राजकुमार राव, पत्रलेखा, ईशा गुप्ता, हेमा मालिनी, अनुपम खेर, भाग्यश्री आणि मिलिंद सोमण हे स्टार्स देखील त्रिवेणी संगमात स्नान करणाऱ्या 45 कोटी भाविकांमध्ये आहे. श्रद्धेचा हा महाकुंभ 26 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील.
हेही वाचा :
- 'मिर्झापूर 3' मालिका बनली भारतातील सर्वाधिक पाहिली जाणारी वेब सीरीज - MIRZAPUR 3 PRIME VIDEO
- 'स्त्री 2' ट्रेलर मध्ये दिसली 'सरकटा'ची दहशत, गावातील स्त्रीयांच्या जीवाला धोका - Stree 2 Trailer
- 'मिर्झापूर'चा चार वर्षानंतर सीझन 3 रिलीज, सोशल मीडियावर प्रेक्षकांचा 'गजब भौकाल हैं'! - Mirzapur Season 3 X Review