महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

शाहू महाराज, डॉ. आंबेडकरांचे संयुक्त स्मारक उभारणार, मागासवर्गीय घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा सरकारचा प्रयत्न - मुख्यमंत्र्यांची घोषणा - CM Eknath Shinde - CM EKNATH SHINDE

CM Eknath Shinde : मुंबईत विवेक विचार मंचातर्फे चौथ्या राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद २०२४ चे रविवारी येथील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आयोजन करण्यात आले होते. मागासवर्गीय घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करणार. याशिवाय माणगाव येथे राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj) आणि भारतरत्न डॉ. आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे संयुक्त स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Etv Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 23, 2024, 10:31 PM IST

मुंबई CM Eknath Shinde : सरकारनं या दोन वर्षात अनेक विकासाभिमुख कामे केली असून, हे सरकार शेतकरी, कष्टकरी, मजूर, महिला, विद्यार्थी या सर्वांचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं रयतेचं राज्य आणण्याचं काम केलं. त्यांचा आदर्श ठेवून छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे काम पुढे अविरत सुरू ठेवलं. आता हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकार काम करत आहे. समता, बंधुता, न्याय या तत्वाद्वारे मागासवर्गीय घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन: विवेक विचार मंचातर्फे चौथ्या राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद 2024 चे आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवना, बार्टीचे महासंचालक डॉ.सुनील वारे, विवेक विचार मंचाचे अध्यक्ष प्रदीप रावत आणि राज्यातील 160 संघटनांचे प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.


शाहू महाराज-बाबासाहेबांचे संयुक्त स्मारक उभारणार :सर्वांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगाराची उपलब्धता आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी गतीनं प्रयत्न केलं जात आहेत. तसेच गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी 5 हजार मुलांना प्रशिक्षण दिलं जात असून, त्यांना हक्काचा रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून नुकताच जर्मनीमध्ये चार लाख रोजगार उपलब्ध होण्यासाठीचा शासन स्तरावर करार करण्यात आला. तसेच राज्यातील कोणताही युवक बेरोजगार राहणार नाही, यासाठी मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना, कौशल्य विकास योजना तसेच स्टार्टअपसारख्या योजना राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. याचा फायदा कित्येक तरुणांना होत आहे. याशिवाय माणगाव (जि. रायगड) येथे राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त स्मारक उभारण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.



जुनी पेन्शन योजना : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करणार. तसेच राज्य शासनाच्या योजना, उपक्रम, ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून होत असते. त्यामुळं कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे. तसेच राज्यात अनेक मोठे विकासाचे प्रकल्प हाती घेतले असून यामुळं कित्येक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. यात कौशल्य विकास विभागामार्फत युवकांना रोजगार उपलब्ध करून देणं, महिला बचत गटांना आर्थिक प्रोत्साहन देण्याचं काम तसेच राज्यातील रस्त्यांच्या रुंदीकरणाचं काम आणि मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले. महत्त्वाचं म्हणजे आषाढी एकादशी निमित्त वारीमध्ये सहभागी वारकरी बांधवांना सर्व-सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, वारकऱ्यांना 5 लाखापर्यंत विमा संरक्षण देण्यात येणार असल्याची माहिती, मुख्यमंत्र्यांनी दिली. दरम्यान, यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज सामजिक न्याय पुरस्कार 2024 चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details