हैदराबाद : जानेवारीमध्ये, युटिलिटी वाहनांच्या वाढत्या मागणीमुळं, प्रवासी वाहनांची एकूण घाऊक विक्री 3,99,386 युनिट्सवर पोहोचली, जी आतापर्यंतची सर्वाधिक आहे. मारुती सुझुकीनं 1,73,599 वाहनांची विक्री केलीय. जी जानेवारी 2024 पेक्षा 4 टक्के जास्त आहे. एकूण दुचाकी विक्री 2.1 टक्क्यांनी वाढून 15,26,218 युनिट्सवर पोहोचलीय.
वाहन विक्री सियाम अहवाल
जानेवारी 2025 मध्ये प्रवासी वाहनांची विक्री विक्रमी 3.99 लाख युनिट्सवर पोहोचली, जी गेल्या वर्षीच्या जानेवारीपेक्षा 1.6 टक्के जास्त आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) नुसार, एसयूव्ही आणि एमपीव्हीच्या वाढत्या मागणीनं या वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. कार विक्री जवळजवळ स्थिर राहिली, तर व्हॅन विक्रीत थोडीशी घट झाली. दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या विक्रीतही वाढ झाली आहे. अलिकडच्या अर्थसंकल्पात आणि आरबीआयनं व्याजदरात कपात केल्यानं ऑटोमोबाईल उद्योगात मागणी वाढण्याची अपेक्षा आहे.
काय आहे अहवालात
सियाम अहवालानुसार, जानेवारी 2024 मध्ये युटिलिटी वाहनांची विक्री 2,00,997 युनिट्सवरून जानेवारी 2025 मध्ये 2,12,995 युनिट्सपर्यंत वाढली. ही 6 टक्के वाढ आहे. कार विक्री जवळजवळ स्थिर राहिली. जानेवारी 2024 मध्ये 1,26,505 कार विकल्या गेल्या आहेत, तर जानेवारी 2025 मध्ये ही संख्या 1,27,165 होती. व्हॅन विक्रीत थोडीशी घट झाली. जानेवारी 2024 मध्ये 12,019 व्हॅन विकल्या गेल्या, तर जानेवारी 2025 मध्ये ही संख्या 11,250 पर्यंत खाली आली. ही 6.4 टक्के घट आहे.
कार विक्री
सियामचे महासंचालक राजेश मेनन म्हणाले की, जानेवारी 2025 मध्ये प्रवासी वाहनांची सर्वाधिक 3.99 लाख युनिट्सची विक्री झाली. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडियाची विक्री जानेवारी 2024 मध्ये 1,66,802 युनिट्सच्या तुलनेत 1,73,599 युनिट्सपर्यंत वाढली. ही 4 टक्के वाढ आहे. ह्युंदाई मोटर इंडियाची विक्री गेल्या वर्षी जानेवारीमध्ये 57,115 युनिट्सच्या तुलनेत ५ टक्क्यांनी घसरून 54,003 युनिट्सवर आली. महिंद्रा अँड महिंद्राची विक्री जानेवारी 2024 मध्ये 43,286 युनिट्सवरून 50,659 युनिट्सवर पोहचलीय.
हे वाचलंत का :