न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या लॉकर धारकांनी काळजी करू नये; बँकिंग तज्ञांचा सल्ला - NEW INDIA COOPERATIVE BANK

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 14, 2025, 9:44 PM IST

मुंबई : रिझर्व्ह बँकेनं न्यू इंडिया को-ऑपरेटिंग बँकेवर निर्बंध लादले असून, रिझर्व्ह बँकेनं न्यू इंडिया को-ऑपरेटिंग बँकेच्या व्यवहारांना बंदी घातली आहे. त्यामुळं न्यू इंडिया को-ऑपरेटिंग बँक कोणतेही नवीन कर्ज देऊ शकणार नाही किंवा ठेवी देखील घेऊ शकणार नाही. कोणतीही नवीन गुंतवणूक घेण्यावर आणि दायित्वे परत करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. रिझर्व बँकेच्या निर्देशानंतर सध्या न्यू इंडिया बँकेच्या ठेवीदारांमध्ये भीतीचं वातावरण असून, या ठेवीदारांनी घाबरून न जाता स्वतःची संघटना तयार करावी असं आवाहन बँकिंग तज्ञ विश्वास उटगी यांनी केलं आहे. सोबतच या बँकेतील लॉकर धारकांनी काळजी न करण्याचं आवाहन देखील  बँकिंग तज्ञ विश्वास उटगी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केलं आहे. ऐकूया ते काय सांगतात.
 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.