गावात एनर्जी ड्रिंक्स विक्री बंद; पेडगाव ग्रामपंचायतचा ठराव - ENERGY DRINKS SALES STOPPED

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 11, 2025, 7:56 PM IST

अहिल्यानगर : जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव (Pedgaon Gram Panchayat) येथे काही दिवसांपूर्वी कोल्ड ड्रिंक्सच्या अतिसेवनाने एका 18 वर्षीय अल्पवयीन मुलाचा बळी गेला होता. या घटनेनंतर गावातील महिला आक्रमक होत गावातील सर्वच अवैध व्यवसाय, गुटखा, दारू, कोल्ड ड्रिंक्स बंद करण्याची मागणी लावून धरली होती. आज अखेर महिलांच्या मागणीचा विचार करत पेडगाव ग्रामपंचायतने लहान मुलाच्या आरोग्याची काळजी घेत, गावात शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक्स (Energy Drinks) विक्री बंद करण्यासाठी ठराव केलाय. या ठरावाला पाठिंबा देत ग्रामस्थांनीही ठरावाच स्वागत केलं.आता गावात ठरावाची थेट अंमलबजावणी देखील सुरू झालीय. गावात कुठल्याही प्रकारचे शीतपेय किंवा एनर्जी ड्रिंक्सची विक्री केली जात नाही. या निर्णयाचं सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.