वनराई आणि हिरवाई जतन करण्यासाठी पुण्यात सयाजी शिंदेंच्या नेतृत्वात 'चिपको आंदोलन'; पाहा व्हिडिओ - PUNE CHIPKO ANDOLAN
🎬 Watch Now: Feature Video
Published : Feb 9, 2025, 10:42 PM IST
पुणे : पुण्यातील नदीकाठची वनराई आणि हिरवाई जतन करण्यासाठी आज पुणे रिव्हर रिव्हायवलतर्फे पदयात्रा काढत चिपको आंदोलन (Pune Chipko Andolan) करण्यात आलं. या पदयात्रेत निसर्गासाठी काम करणारे अभिनेता सयाजी शिंदे (Sayaji Shinde) आणि सोनम वांगचुक (Sonam Wangchuck) यांनी देखील सहभाग घेतला होता. या चिपको आंदोलनाद्वारे निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी आणि पुण्याचा नैसर्गिक वारसा जपण्यासाठी नदीकाठच्या परिसंस्था कशा महत्त्वाच्या आहेत याबद्दल जनजागृती करण्यात आली. विकासाच्या नावाखाली बेबंद बांधकामांसाठी हजारो जुने वृक्ष धोक्यात आलेले असताना, हा महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज काढण्यात आलेल्या पदयात्रेत अनेकांनी झाडाला मिठी मारत चिपको आंदोलन केलं. तर अनेकांनी हातात विविध फलक घेत निसर्गाबाबत जनजागृती केली. तर काय म्हणाले सयाजी शिंदे? पाहा व्हिडिओ