नवी मुंबईत महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांचं 'काम बंद आंदोलन' सुरू, आठ हजारपेक्षा अधिक कामगार संपावर - CONTRACT WORKERS KAM BAND ANDOLAN
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/10-02-2025/640-480-23510329-thumbnail-16x9-kam-band-andolan.jpg)
![ETV Bharat Marathi Team](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/authors/maharastra-1716536262.jpeg)
Published : Feb 10, 2025, 9:56 AM IST
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेत विविध विभागांमध्ये कंत्राटी स्वरूपात कार्यरत असलेल्या 8,050 कामगारांनी आजपासून (10 फेब्रुवारी) कामबंद आंदोलन पुकारलंय. 'समान काम, समान वेतन' या मागणीसाठी हे आंदोलन केलं जातंय. समाज समता कामगार संघाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून यापूर्वीच प्रशासनाला याबाबत इशारा देण्यात आला होता. मात्र, प्रशासनानं कामगारांच्या कोणत्याही प्रश्नांची दखल न घेतल्यानं अखेर कामगारांनी संपाचं शस्त्र उगारलंय. सकाळपासून आंदोलनाला सुरुवात झाल्यानं स्वच्छता, जलपुरवठा, आरोग्य, बागायती, बांधकाम आणि अन्य महत्त्वाच्या विभागांचं कामकाज ठप्प झालंय. त्यामुळं नवी मुंबईत मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर "काम बंद आंदोलनाद्वारे नवी मुंबईकरांना वेठीस धरण्याचा आमचा हेतू नाही," असं कामगार संघटनेच्या नेत्यांनी स्पष्ट केलय.