दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव; अण्णा हजारे यांची टीका - ANNA HAZARE ON ARVIND KEJRIWAL

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 8, 2025, 9:24 PM IST

अहिल्यानगर : दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'ला धक्का बसला असून अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक नेत्यांचा पराभव झाला. भ्रष्टाचारविरोधी चळवळीतील प्रमुख चेहरा असलेल्या केजरीवालांना मतदारांनी नकार दिला आहे.

आपची स्थापना हजारे यांच्या लोकपाल आंदोलनातून झाली. पक्ष स्थापनेनंतर दोघांमध्ये मतभेद झाले. आपच्या पराभवानंतर हजारे म्हणाले की, " केजरीवालांना सावध केलं होतं, पण त्यांनी ऐकलं नाही. मतदार सुज्ञ आहेत. दारूला प्रोत्साहन देणारे आणि भ्रष्टाचारात अडकलेल्या सरकार मतदारांनी घरचा रस्ता दाखवला."

केजरीवाल यांचं पहिलं सरकार आल्यानंतर हजारे यांनी त्यांचे कौतुक केलं होतं. त्यानंतर हजारेंनी केजरीवालांवर वारंवार टीका केली. "केजरीवालांनी सुरुवातीला चांगली कामं केली, पण सत्ता आणि पैशाची मस्ती त्यांच्या डोक्यात गेली. त्यांना चारित्र्य, विचार शुद्ध ठेवण्याचा सल्ला दिला होता, पण त्यांनी दुर्लक्ष केले. गैरप्रकारांमुळे दिल्लीच्या त्यांना नाकारले," असं हजारे म्हणाले. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.