12.75 लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त, कर तज्ज्ञ मोदी म्हणतात... - UNION BUDGET 2025

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 1, 2025, 3:31 PM IST

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केलाय. या अर्थसंकल्पामध्ये मध्यमवर्गीयांसाठी सर्वात मोठी घोषणा ठरली ती म्हणजे एकूण 12 लाख 75 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न हे आता करमुक्त राहणार आहे. या संदर्भात करतज्ज्ञ बकुल मोदी यांच्याशी ईटीवी भारतने संवाद साधलाय. बकुल मोदी यांनी सांगितले की, गेल्या 20 वर्षांत पहिल्यांदाच एक लाख कोटी रुपयांचा तोटा सहन करणारा हा पहिला अर्थसंकल्प मी पाहिलाय. अर्थमंत्र्यांनी मोठी घोषणा करूनच षटकार मारलाय. पण ज्या निर्णयाची कर सवलतींची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. सर्वसामान्यांना दिलासा देणे फार महत्त्वाचे होते. विशेष म्हणजे अर्थव्यवस्थेची गाडी सुरू राहण्यासाठी सर्वसामान्य लोकांच्या हातात पैसा खेळता राहणे हे आवश्यक आहे. साधारणतः 10 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त असेल, असे वाटत होते. पण या गोष्टीमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांच्या हातात खर्च करण्यासाठी पैसा उपलब्ध राहील आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला निश्चितच चालना मिळेल, असे मोदी म्हणाले. कस्टम ड्युटीबद्दल मोदी यांनी सांगितले की, सरकारने जीवनावश्यक औषधी आणि इतर वस्तूंवरील कस्टम ड्युटी कमी केलीय. त्याचा सरकारला काही प्रमाणात तोटा होणार आहे. मात्र सरकार त्याची भरपाई निश्चितच दुसऱ्या मार्गाने करेल. पण याचा सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. कर क्षेत्रामध्ये अपेक्षित आहे आणि ते सरकार करत आहे. त्याचे दीर्घकालीन फायदे होतील, असंही बकुल मोदी म्हणालेत. 
 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.