पूमा शोरुमला भीषण आग; हजारो शूज आगीत जळाले! - THANE FIRE
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 28, 2025, 1:59 PM IST
ठाणे- हायपर सिटी मॉलमधील पूमा शोरुमला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली. या आगीवर तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. ही आग विझवण्यासाठी ठाणे अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापन टीम तासभर प्रयत्न करत होती. या आगीमुळे शोरुममधील हजारो शूज जळाले आहेत. या आगीत सुदैवानं कोणीही जखमी झालं नाही. ठाणे महानगर पालिकेची अग्निशमन यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी कासार वडवली भागात पोहोचली. त्यानंतर एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलृं. मात्र, या आगीमुळे झालेला धूर पाच किलोमीटर दुरूनही दिसत होता. अग्निशमन दल आगीच्या कारणांचा शोध घेत आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज अग्निशमनदलानं व्यक्त केला आहे.