पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू - PUNE ACCIDENT
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jan 25, 2025, 12:13 PM IST
पुणे : पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात झाला. आज (25 जाने.) पहाटे हा अपघात झाला. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास बाह्यवळण महामार्गावर वडगाव ब्रिजजवळ थांबलेल्या बसला (MH 14 GD 7605) मागून येणाऱ्या स्विफ्ट (MH 12 KW 3663) कारनं जोरदार धडक दिल्यामुळं हा अपघात झाला. या अपघातात वाढदिवसाची पार्टी करुन परत येत असलेल्या कारमधील सहापैकी दोन युवक जागीच ठार झालेत. तर जखमींना आधी नवले रुग्णालय आणि नंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलय. सोहम आलिष खळे (वय 19, रा. औंध, पुणे), आयुष अंबिदास काटे (वय 20, रा. दापोडी, पुणे), अथर्व हंबीरराव झेडगे (वय 19, रा. पिंपळे गुरव, पुणे), प्रतीक दीपक बंडगर (वय 19 रा. गांगर्डे नगर पिंपळे गुरव पुणे), हर्ष नितीन वरे (वय 19, रा. पिंपळे गुरव) अशी जखमींची नावं आहेत. बस चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे.