ETV Bharat / state

विद्येचं माहेरघर हादरलं; स्वारगेट स्थानकातील बसमध्येच तरुणीवर बलात्कार - PUNE GIRL RAPED IN BUS

स्वारगेट बसस्थानकातील एका बसमध्येच 26 वर्षीय तरुणीवर नराधमानं बलात्कार केल्यानं खळबळ उडाली. ही तरुणी पुण्यावरुन फलटणला जाण्यासाठी निघाली होती.

Pune Girl Raped In Bus
प्रतिकात्मक छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 26, 2025, 1:07 PM IST

Updated : Feb 26, 2025, 1:17 PM IST

पुणे : स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर बसमध्येच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. एसटी बसमध्ये हा प्रकार घडल्यानं विद्येच्या माहेरघरात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून त्याच्या शोधासाठी 8 पथकं रवाना करण्यात आली आहेत.

एसटी बसमध्ये तरुणीवर बलात्कार : एक 26 वर्षीय तरुणी पुण्यावरुन फलटणला जाण्यासाठी बसस्थानकावर आली. यावेळी संशयित आरोपीनं तिला बस तिकडं लागली आहे, असं सांगून बसमध्ये नेलं. यावेळी नराधमानं बसमध्येत तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर आरोपीनं घटनास्थळावरुन पोबारा केला. हादरलेल्या तरुणीनं आरडाओरडा केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची ओळखही पटली असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची आठ पथकं रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

पुण्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली - सुषमा अंधारेंचा हल्लाबोल : "पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत धक्कादायक आहे. ही घटना चक्रावून टाकणारी आहे. 15 वर्षापूर्वीचं पुणे आणि आताचं पुणे फार बदललं आहे. आपण सुरक्षीत घरी पोहोचू याची अगोदर हमी होती, मात्र आता पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. पुण्यातील शाळा कॉलेज, बसस्थानक परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी आम्ही वारंवार करत आहोत. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे पुण्यातील सुरक्षेसाठी पालकमंत्र्यांनी लक्ष घालावं. पुणे पोलिसांचं नेमकं काय सुरू आहे, याचा जाब पालकमंत्र्यांनी पुणे पोलिसांना विचारावा," असा हल्लाबोल उबाठा उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला.

हेही वाचा :

  1. धक्कादायक : दिराचा वाहिनीवर बलात्कार: पतीही करायचा अनैसर्गिक अत्याचार, पोलीस करणार चौकशी
  2. धक्कादायक ! 42 वर्षीय सासऱ्यासह मित्राचा 20 वर्षीय सुनेवर बलात्कार; तब्बल 15 दिवस डांबून नराधमांनी केले अत्याचार
  3. लव्ह प्यार और धोका ! सोशल माध्यमांवरील प्रेम कहाणीची शिकार ठरली पीडित तरुणी, नराधमानं केला बलात्कार अन् मग . . .

Last Updated : Feb 26, 2025, 1:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.