गॉल Australia Double Wins : 1 फेब्रुवारी हा दिवस ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी खूप खास होता. ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघानं श्रीलंकेतील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना एकतर्फी जिंकला. दुसरीकडं, महिला अॅशेस ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळली गेली. यात, ऑस्ट्रेलियन महिला संघानं दोन्ही संघांमध्ये खेळलेला एकमेव कसोटी सामना जिंकण्यातही यश मिळवले. विशेष म्हणजे दोन्ही ऑस्ट्रेलियन संघांनी जवळजवळ एकाच वेळी सामने जिंकले आणि निकालही सारखाच दिसून आला.
A pretty good day for Australian cricket! pic.twitter.com/zGW0mZ8zUf
— cricket.com.au (@cricketcomau) February 1, 2025
ऑस्ट्रेलियाकडून श्रीलंकेचा दारुण पराभव : दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं श्रीलंकेचा एक डाव आणि 242 धावांनी पराभव केला. हा सामना पूर्ण 4 दिवसही टिकू शकला नाही. यासह ऑस्ट्रेलियानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियानं पहिला डाव 6 गडी गमावून 654 धावांवर घोषित केला. पण श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात 165 धावांवर सर्वबाद झाला, ज्यामुळं त्यांना फॉलोऑन खेळावा लागला. दुसऱ्या डावातही श्रीलंकेला काही खास करता आले नाही आणि त्यांचा डाव 247 धावांवर संपला.
An innings win for the Aussie men in Galle as well 🙌#SLvAUS pic.twitter.com/rZBkx80XDM
— cricket.com.au (@cricketcomau) February 1, 2025
कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा डावातील विजय :
- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डाव आणि 360 धावा, जोहान्सबर्ग, 2002
- डाव आणि 332 धावा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, ब्रिस्बेन, 1946
- डाव आणि 259 धावा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, गकेबेर्हा, 1950
- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डाव आणि 242 धावा, गॅले, 2025*
- डाव आणि 226 धावा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, ब्रिस्बेन, 1947
Australia put a cherry on top of their Ashes win by handing England an innings defeat in the day-night Test to take the series 16-0 #Ashes
— cricket.com.au (@cricketcomau) February 1, 2025
Match report + highlights: 👇https://t.co/RUDaGcs0wm
ऑस्ट्रेलियाची दमदार कामगिरी : या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजानं सर्वाधिक धावा केल्या. त्यानं पहिल्या डावात 232 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथनंही शतक झळकावलं. त्यानं 141 धावा केल्या आणि पदार्पणाचा कसोटी सामना खेळणाऱ्या जोश इंग्लिसनं 94 चेंडूत 102 धावा केल्या. दुसरीकडे, मॅथ्यू कुहनेमन या सामन्यातील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 4 विकेट घेतल्या. नॅथन लायननंही शानदार कामगिरी केली. या सामन्यात त्यानं एकूण 7 विकेट्स घेतल्या.
Total domination from Australia as they wrap up the Women's Ashes in style 🥵#AUSvENG 📝: https://t.co/QwpEWOemjs pic.twitter.com/TnZSyKP1ex
— ICC (@ICC) February 1, 2025
ऑस्ट्रेलिया महिलांनीही डावानं जिंकला सामना : पुरुष संघाप्रमाणे ऑस्ट्रेलियन महिला संघानंही श्रीलंकेला एक डाव आणि 122 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात, प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड महिला संघानं पहिल्या डावात फक्त 170 धावा केल्या. प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियन महिला संघानं त्यांच्या पहिल्या डावात 440 धावा केल्या. त्याच वेळी, इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात काही खास कामगिरी करु शकला नाही आणि 148 धावा करुन सर्वबाद झाला. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन संघ मोठा विजय नोंदवण्यात यशस्वी झाला.
Spinners secure an innings win for Australia in the first Test against Sri Lanka 👌#WTC25 | #SLvAUS 📝: https://t.co/8NKpfnNf96 pic.twitter.com/KB1z31zofV
— ICC (@ICC) February 1, 2025
हेही वाचा :