ETV Bharat / state

बलात्कार करुन महिलेची हत्या; २५ वर्षीय आरोपीला अटक - NAGPUR RAPE CASE

नागपूरात एका ३३ वर्षीय महिलेवर अज्ञात आरोपीने बलात्कार करून तिचा खून केल्याची (Rape And Murder) धक्कदायक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी २५ वर्षीय आरोपीला अटक केलीय.

Nagpur Rape Case
बलात्कार प्रकरण (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 8, 2025, 9:44 PM IST

नागपूर : सहा फेब्रुवारी रोजी नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका ३३ वर्षीय महिलेवर अज्ञात आरोपीने बलात्कार केल्यानंतर तिचा खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. शवविच्छेदन अहवालात हा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असता पोलिसांनी एका २५ वर्षीय आरोपीला अटक केलीय. आरोपी हा मृत महिलेच्या कुटुंबाशी परिचित असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांनी दिली.

महिलेकडं केली शारीरिक सुखाची मागणी : रोहित टेकाम असं आरोपीचं नाव आहे. आरोपी रोहित पेंटिंगचं काम करत होता. रोहित आणि हत्या झालेल्या महिलेची एक-दीड वर्षांपूर्वी कामाच्या ठिकाणी ओळख झाली होती. त्यातून दोघांमध्ये मैत्री झाली होती. घटनेच्या दिवशी आरोपी रोहितने त्या महिलेला फोन केला असता त्यास समजलं की महिला घरी एकटीच आहे. त्यानंतर रोहित हा महिलेच्या घरी गेला. इथे दोघांनी दारूचं सेवन केलं. दारूच्या नशेत आरोपी रोहित महिलेकडं शारीरिक सुखाची मागणी केली. मात्र, महिलेनं स्पष्ट नकार दिल्यानं चिडलेल्या आरोपींनं मृत महिलेवर बलात्कार करून तिची गळा आवळून हत्या केली. शवविच्छेदन अहवालात बलात्कार आणि हत्येची बाब पुढे येताचं पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असता त्या दिवशी महिलेच्या घरी रोहित आला असल्याचं समजलं. त्यानंतर पोलिसांनी रोहित टेकामचा शोध घेऊन अटक केली असता आरोपीनं गुन्हा मान्य केल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांनी दिली.

प्रतिक्रिया देताना पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर (ETV Bharat Reoprter)

११ फेब्रुवारी पर्यत पोलीस कोठडी : आज पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं आरोपीला ११ फेब्रुवारी पर्यत पोलीस कोठडी सुनावणी आहे. आरोपी रोहितने हे कृत एकट्यानं केलं की त्याच्यासोबत आणखी कुणी होतं? याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

काय आहे प्रकरण : मृत ३३ वर्षीय महिला ही मुळची मध्यप्रदेशातील रहिवासी असून, कामधंद्यासाठी ती ५ ते ६ वर्षापासून नागपूरात राहत होती. तर तिचा पती एका ढाब्यावर काम करतो. तिची मुलगी सकाळी शाळेत गेली होती आणि दुपारी पतीही ढाब्यावर कामाला गेला होता. दुपारी महिला घरी एकटीच होती. दरम्यान कुणीतरी अनोळखी इसम घरात घुसला आणि ती घरी एकटीच असल्याचं पाहून तिच्यावर बळजबरीनं बलात्कार केला. ती नंतर आरडाओरडा करील आणि आपले बिंग फुटेल या भितीनं, त्यानं तिचा गळा आवळून खून केला आणि पळून गेला.

महिलेचा मृत्यू झाला : महिलेची मुलगी संध्याकाळी घरी परत आली असता, तिला आई झोपलेल्या स्थितीत दिसली. यामुळं तिनं आईला उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु महिलनेने प्रतिसाद दिला नाही. यामुळं ती घाबरली, रडत ढब्यावर वडीलाला बोलावण्यास गेली आणि आई उठत नसल्याचं सांगितलं. घरी आल्यानंतर पत्नीचा मृत्यू झाला असल्याचं निदर्शनास आलं.

शवविच्छेदन अहवालातुन झालं स्पष्ट : या घटनेची माहिती समजल्यानंतर हुडकेश्वर पोलीस ठाणेदार ज्ञानेश्वर भेदोडकर आणि त्यांच्या पथकानं लगेच घटना स्थळाला भेट दिली. दरम्यान महिलेच्या कानातून रक्त निघत असल्याचं दिसलं आणि कुठेही जखमा नव्हत्या. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करुन, शव उत्तरीय तपासणी करीता मेडिकल येथे पाठवला. शवविच्छेदना दरम्यान सदर महिलेचा गळा आवळून खून झाल्याचं उघडकीस आलं. यावरून अनोळखी व्यक्ती विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांनी दिली.

हेही वाचा -

  1. मुंबईत तरुणीवर बलात्कार: नराधमानं गाठली अत्याचाराची परिसीमा, गुप्तांगात घातले ब्लेड आणि दगड
  2. लव्ह प्यार और धोका ! सोशल माध्यमांवरील प्रेम कहाणीची शिकार ठरली पीडित तरुणी, नराधमानं केला बलात्कार अन् मग . . .
  3. धक्कादायक : दिराचा वाहिनीवर बलात्कार: पतीही करायचा अनैसर्गिक अत्याचार, पोलीस करणार चौकशी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.