हैदराबाद : दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज मॅथ्यू ब्रित्झकीनं आपल्या पहिला एकदिवसीय सामन्यात इतिहास रचलाय. मॅथ्यू ब्रित्झकी हा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पदार्पणाच्या सामन्यात सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज बनला आहे. पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणाऱ्या त्रिकोणी एकदिवसीय मालिकेत ब्रित्झकीनं न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 150 धावा केल्या. ब्रित्झकी एकदिवसीय पदार्पणात 150 धावा करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. न्यूझीलंडविरुद्ध, ब्रित्झकीनं 148 चेंडूत 150 धावा केल्या, त्यात 5 षटकार आणि 11 चौकाराचा समावेश आहे.
Matthew Breetzke!! 🌟🔥👏 First ever player to score 150+ on ODI debut.
— Proteas Men (@ProteasMenCSA) February 10, 2025
Phenomenal, just phenomenal 🏏💥.#WozaNawe #BePartOfIt #NZvSA pic.twitter.com/8SjcG74FvM
शतक करणारा दक्षिण आफ्रिकेचा चौथा फलंदाज
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेनं ब्रित्झकीच्या खेळीच्या जोरावर 50 षटकांत 6 बाद 304 धावा केल्या. ब्रित्झकी व्यतिरिक्त, वियान मुल्डरनं 60 चेंडूत 64 धावा केल्या. या सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यासह, मॅथ्यू ब्रित्झकी हा पुरुष एकदिवसीय पदार्पणात शतक करणारा चौथा दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज बनला आहे. ब्रित्झकी सध्या फक्त 26 वर्षांचा आहे आणि टी-20 व्यतिरिक्त त्यानं कसोटीतही पदार्पण केलं आहे.
A fantastic ODI ton on debut for Matthew Breetzke 👏🏏#SAvNZ 📝: https://t.co/6q3VpZ0IL3 pic.twitter.com/DRW6Uxf3tv
— ICC (@ICC) February 10, 2025
दुसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेनं ब्रित्झकी आणि कर्णधार टेम्बा बावुमा यांच्या मदतीनं चांगली सुरुवात केली. तथापि, विल ओ'रूर्केनं बावुमाला 23 चेंडूत 20 धावा देऊन बाद केलं. जेसन स्मिथ आणि ब्रित्झकी यांनी दुसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली, परंतु दुर्दैवानं, दोघांमध्ये समन्वय साधण्यात अपयश आलं. स्मिथ 51 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांसह 41 धावा करून धावबाद झाला. काइल व्हेरीन (1) आणि सेनुरन मुथूस्वामी (2) हे देखील धावा काढण्यात अपयशी ठरले.
WICKET.
— Proteas Men (@ProteasMenCSA) February 10, 2025
150 and out for Matthew Breetzke, what a performance. Highest ever score by a South African batter on ODI debut.
🇿🇦 SA 263/4 after 45.2 Overs.#WozaNawe #BePartOfIt #NZvSA
वन डे पदार्पणात सर्वोत्तम धावा
Highest Individual Score In ODIs On Debut | |||||
Player | Runs | Team | Opposition | Ground | Match Date |
MP Breetzke | 150 | South Africa | v New Zealand | Lahore | 10 Feb 2025 |
DL Haynes | 148 | West Indies | v Australia | St John's | 22 Feb 1978 |
Rahmanullah Gurbaz | 127 | Afghanistan | v Ireland | Abu Dhabi | 21 Jan 2021 |
CA Ingram | 124 | South Africa | v Zimbabwe | Bloemfontein | 15 Oct 2010 |
MS Chapman | 124 | Hong Kong | v U.A.E. | ICCA Dubai | 16 Nov 2015 |
हे वाचलंत का :