हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतलीय. यावेळी दोन्ही नेत्यांनी जागतिक स्तरावर सर्वात वेगानं कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर सहकार्य करण्याचं मान्य केलंय. सीएनबीसीच्या अहवालानुसार, मोदींसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प म्हणाले, "अमेरिका आणि भारत एआय तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी एकत्र येत आहेत. आम्हाला एआयमध्ये अव्वल राहायचं आहे."
महत्त्वाच्या तंत्रज्ञानावर एकत्र काम
एआय व्यतिरिक्त, दोन्ही देशांनी सेमीकंडक्टर, क्वांटम कॉम्प्युटिंग, बायोटेक्नॉलॉजी आणि इतर महत्त्वाच्या तंत्रज्ञानावर एकत्र काम करण्याचंही मान्य केलं, असं मोदींनी यावेळी बोलताना म्हटलंय. तसंच दोन्ही नेत्यांनी अमेरिका भारत ट्रस्ट उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली. या उपक्रमाचा उद्देश सरकारे, शैक्षणिक संस्था आणि खाजगी क्षेत्र यांच्यातील सहकार्य मजबूत करणे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा उपक्रम संरक्षण, एआय, सेमीकंडक्टर, क्वांटम कॉम्प्युटिंग, बायोटेक्नॉलॉजी, ऊर्जा आणि अवकाश यावर लक्ष केंद्रित करणार आहे.
"आज, आम्ही ट्रस्ट-स्ट्रॅटेजिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर सहमत झालो आहोत,". "हा उपक्रम महत्त्वपूर्ण खनिजं, प्रगत साहित्य आणि औषधांसाठी मजबूत पुरवठा साखळी तयार करण्यास प्राधान्य देईल."- पंतप्रधान नरेंद्र मोदी
21 वं शतक 'तंत्रज्ञानाचं शतक'
पुढं बोलताना मोदी म्हणाले, "21 वं शतक 'तंत्रज्ञानाचं शतक' आहे. लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या कोणत्याही देशानं तंत्रज्ञानाचा विकास मोठ्या लोकहितासाठी केला पाहिजे." 2030 पर्यंत भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार 500 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचं ध्येय ठेवलं आहे. भारताची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तेल, वायू व्यापारावर भर देण्यात येणार आहे. यामुळं ऊर्जा पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक देखील वाढेल. अणुऊर्जेच्या क्षेत्रात, आम्ही लहान मॉड्यूलर रिॲक्टर्ससाठी सहकार्य वाढवण्यावर चर्चा केलीय. भारताच्या संरक्षण तयारीत अमेरिकेची महत्त्वाची भूमिका आहे. धोरणात्मक आणि विश्वासार्ह भागीदार म्हणून, आम्ही संयुक्त विकास, संयुक्त उत्पादन आणि तंत्रज्ञानाकडे वाटचाल करत आहोत. येणाऱ्या काळात, नवीन तंत्रज्ञान आणि उपकरणे देखील आपल्या क्षमता वाढवतील. आम्ही ऑटोनॉमस सिस्टीम्स इंडस्ट्री अलायन्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे".
तंत्रज्ञानाचा वापर करून परिवर्तन
"भारत आणि अमेरिका कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, क्वांटम, बायोटेक्नॉलॉजी आणि इतर तंत्रज्ञानात एकत्र काम करतील. आज आपण TRUST वर सहमत झालो आहोत, म्हणजेच धोरणात्मक तंत्रज्ञानाचा वापर करून संबंधांमध्ये परिवर्तन करणार आहोत. याअंतर्गत, महत्त्वपूर्ण खनिजे, प्रगत साहित्य आणि औषधांच्या मजबूत पुरवठा साखळ्या तयार करण्यावर भर दिला जाईल. लिथियम आणि दुर्मिळ खनिजांची पुनर्प्राप्ती आणि प्रक्रिया उपक्रम सुरू करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. अंतराळ क्षेत्रात आमचे अमेरिकेसोबत जवळचं सहकार्य आहे. "इस्रो" आणि "नासा" यांच्या सहकार्यानं तयार केलेला "निसार" उपग्रह लवकरच भारतीय प्रक्षेपण वाहनातून अवकाशात जाईल".
हे वाचलंत का :