पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ( Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) देशभरात उत्साहानं साजरी करण्यात येत आहे. जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावर आज शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला.. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थित राहिले आहेत.
Live Updates-
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. त्यांनी एक्स मीडियातील पोस्टमध्ये म्हटलं, "छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. त्यांच्या पराक्रमानं आणि दूरदर्शी नेतृत्वानं स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत."
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो.
— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2025
त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी… pic.twitter.com/zu0vLviiPf
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवरायांना मानवंदना व्यक्त केली. यावेळी ते बोलताना म्हणाले, " किल्ल्यावरील सर्व अतिक्रमणे काढून टाकण्यात येणार आहेत. छत्रपतींचे १२ किल्ले जागतिक वारसास्थळे घोषित करण्यासाठी सादरीकरण करण्यात येणार आहे. शिवराय हे उत्तम प्रशासक होते. त्यांनी मावळ्यांची फौज तयार केली. आपल्या देशाच्या पाठीशी शिवरायांची प्रेरणा आहे. त्यांचे गडकिल्ले कोणत्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत. गडकिल्ले हे जागतिक वारसा होणार आहेत."
- शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्माचा सोहळा सुरू आहे.
- शासकीय मानवंदना देण्यात आली आहे.
- मुधाळने येथील जिल्हा परिषदेच्या मुलांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवचरित्र सादर केलं
भारत की आस्था और अस्मिता के रक्षक, 'हिंदवी स्वराज' के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज की जयंती पर उन्हें कोटि-कोटि नमन!
— Yogi Adityanath (@myogiadityanath) February 19, 2025
धर्म, संस्कृति और स्वाभिमान की रक्षा के लिए उनका त्यागमय जीवन हम सभी को सदैव प्रेरित करता रहेगा। pic.twitter.com/0xwYxR0UAR
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत छत्रपतींना अभिवादन केलं आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं, भारताच्या श्रद्धेचे आणि अस्मितेचे रक्षक, 'हिंदवी स्वराज्याचे' संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आम्ही त्यांना आदरांजली अर्पण करतो! त्यांनी धर्म, संस्कृती आणि प्रतिष्ठेसाठी दिलेले बलिदान आपल्या सर्वांना नेहमीच प्रेरणा देईल.
छत्रपती शिवराय म्हणजे मातृभूमीला लाभलेलं एक बहुमूल्य वरदानच, महाराजांनी पेटवलेली क्रांतीची मशाल पिढ्यानपिढ्या पुढं सरसावत आहे एखाद्या झंझावाताप्रमाणे म्हणूनच, छत्रपती शिवाजी महाराज आजही सर्वांच्या श्वासात, मनात, हृदयात, जगण्यात वसतात.
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) February 19, 2025
शून्यातून स्वराज्य उभारुन नवा इतिहास रचणाऱ्या… pic.twitter.com/k2KxVuqESn
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे यांनी शिवरायांना अभिवादन करत म्हटलं, " छत्रपती शिवराय म्हणजे मातृभूमीला लाभलेलं एक बहुमूल्य वरदानच, महाराजांनी पेटवलेली क्रांतीची मशाल पिढ्यानपिढ्या पुढं सरसावत आहे. एखाद्या झंझावाताप्रमाणे म्हणूनच, छत्रपती शिवाजी महाराज आजही सर्वांच्या श्वासात, मनात, हृदयात, जगण्यात वसतात. शून्यातून स्वराज्य उभारुन नवा इतिहास रचणाऱ्या शिवरायांनी दाखवून दिलेल्या मार्गावरुन चालण्याचा निश्चय करुयात. संपूर्ण देशवासियांना शिवजयंतीच्या मंगलमय शुभेच्छा."
Jai Bhavani! Jai Shivaji!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 19, 2025
Honouring Chhatrapati Shivaji Maharaj, founder of Hindavi Swarajya on his Birth Anniversary!
हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा!#शिवजयंती #छत्रपती_शिवाजी_महाराज #ChhatrapatiShivajiMaharaj #ShivJayanti… pic.twitter.com/N7Fv2PtyKz
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रयतेचा राजा अशी ओळख असलेल्या शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं, "हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा!यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, युगप्रवर्तक, महापराक्रमी, हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक, आमचे आराध्य दैवत, राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा! शिवजयंतीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!
राजस्थानचे राज्यपाल आणि भाजपाचे माजी खासदार हरिभाऊ किसनराव बागडे आणि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी आज जयपूर येथील राजभवन येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पांजली अर्पण केली.
हेही वाचा-