लाहोर Playing 11 for 4th ODI : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शनिवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट संघात सामना खेळवला जाईल. या सामन्यासाठी इंग्लंडनं 48 तासांआधीच त्यांच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. भारताविरुद्ध खेळलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तेच खेळाडू समाविष्ट केले गेले आहेत. मात्र जेमी स्मिथ यष्टिरक्षक म्हणून परतला आहे. तो दुखापतग्रस्त होता पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं आहे. स्फोटक फलंदाज टॉम बँटनला वगळण्यात आलं आहे. तो भारताविरुद्ध तिसरा वनडे सामना खेळला होता पण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम अकरा संघात त्याला स्थान मिळालं नाही.
England name playing XI for their opening #ChampionsTrophy 2025 encounter against Australia 🏏https://t.co/2qd1pI8cS6
— ICC (@ICC) February 20, 2025
कशी आहे प्लेइंग इलेव्हन : आपण जर इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल बोललो तर फिल सॉल्ट आणि बेन डकेट हे सलामीवीर फलंदाज म्हणून दिसतील. भारताविरुद्धच्या मालिकेत या दोन्ही खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केली होती. यानंतर, यष्टीरक्षक फलंदाज जेमी स्मिथ तिसऱ्या क्रमांकावर खेळेल आणि जो रुट चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसेल. हॅरी ब्रुक पाचव्या क्रमांकावर खेळेल. त्याची अलीकडील कामगिरी तितकीशी चांगली राहिलेली नाही आणि तो ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध कशी कामगिरी करतो हे पाहणं मनोरंजक असेल.
ENGLAND'S PLAYING XI VS AUSTRALIA FOR THE MATCH ON 22ND FEB:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 20, 2025
Salt, Duckett, Smith (WK), Root, Brook, Buttler (C), Livingstone, Carse, Archer, Rashid and Wood. pic.twitter.com/l1BRu2eoQ9
संघाची गोलंदाजी मजबूत : यानंतर कर्णधार जॉस बटलर सहाव्या क्रमांकावर दिसेल. तो सामना फिनिश करण्याची जबाबदारी घेईल. लियाम लिव्हिंगस्टोन सातव्या स्थानावर असेल. तो काही आक्रमक फटके मारण्यासाठी देखील ओळखला जातो. गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, मार्क वूड आणि आदिल रशीद यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं आहे. पहिल्या सामन्यासाठी जेमी ओव्हरटनलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही.
पहिल्या सामन्यासाठी इंग्लंडची प्लेइंग 11 :
बेन डकेट, फिल साल्ट, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), जो रुट, हॅरी ब्रूक, जॉस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.
We've named our XI for the first game against Australia 👇
— England Cricket (@englandcricket) February 20, 2025
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील इंग्लंडचे साखळी फेरीतील सामने :
- 22 फेब्रुवारी: ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर
- 26 फेब्रुवारी: अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर
- 1 मार्च: दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची
भारताविरुद्ध झाला होता पराभव : मागिल महिन्यात झालेल्या भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत इंग्लंडची कामगिरी तितकीशी चांगली नव्हती. वनडे मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत, संघाचा चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात विजयानं कराचा प्रयत्न असेल.
हेही वाचा :