हैदराबाद : भारतातील आघाडीची SUV उत्पादक कंपनी महिंद्रा ICE सेगमेंट तसंच इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये अनेक SUV ऑफर करते. कंपनीनं आजपासून दोन नवीन SUV ची बुकिंग सुरू केली आहे. यामध्ये Mahindra BE6 आणि XEV 9e या दोन कारचा समावेश आहे. या दोन्ही कार किती पैशात बुक करता येतील? त्यांची डिलिव्हरी कधी सुरू होईल?,चला जाणून घेऊया या बातमीतून..
महिंद्रा BE6 आणि XEV 9e साठी बुकिंग सुरू
महिंद्रानं काही दिवसापूर्वी लाँच केलेल्या SUV Mahindra BE6 आणि Mahindra XEV 9e ची बुकिंग आजपासून सुरू केली आहे. दोन्ही इलेक्ट्रिक SUV साठी बुकिंग डीलरशिपद्वारे ऑनलाइन तसंच ऑफलाइन मोडद्वारे करता येते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 14 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून बुकिंग सुरू करण्यात आली आहे.
डिलिव्हरी कधी सुरू होईल?
महिंद्रानं दिलेल्या माहितीनुसार, टॉप व्हेरिएंट म्हणून देण्यात येणाऱ्या पॅक थ्रीची डिलिव्हरी मार्च 2025 मध्ये सुरू होईल. पॅक टू आणि पॅक थ्री सिलेक्टची डिलिव्हरी जून आणि जुलै 2025 मध्ये सुरू होईल. त्यानंतर, पॅक टूची डिलिव्हरी सुरू होईल. महिंद्रा BE 6 आणि XEV 9e च्या बेस व्हेरिएंट म्हणून देण्यात येणाऱ्या पॅक वन आणि पॅक वन अबव्हची डिलिव्हरी ऑगस्ट 2025 पासून सुरू होईल.
काय आहे किंमत
महिंद्रानं पाच व्हेरिएंटमध्ये BE6 लाँच केली आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 18.90 लाख रुपयांपासून सुरू होते. तिचा टॉप व्हेरिएंट 26.90 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करता येणार आहे. त्याच वेळी, महिंद्रा XEV 9e ची एक्स-शोरूम किंमत 21.90 लाख रुपयांपासून सुरू होते आणि तिचा टॉप व्हेरिएंट 30.50 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. तो चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.
कोणाशी करणार स्पर्धा
महिंद्रा BE6 आणि XEV 9e इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये आणण्यात आल्या आहेत. या सेगमेंटमध्ये, ते Tata Curvv EV, MG Windsor EV, Hyundai Creta EV, MG ZS EV, BYD Atto3 सारख्या SUV तसंच लवकरच लाँच होणाऱ्या मारुती E Vitara आणि Tata Harrier EV सारख्या SUV शी स्पर्धा करेल.
हे वाचलंत का :