हैदराबाद : भारत 6G च्या दिशेन वाटचाल करत आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भारत 2027 पर्यंत जपान आणि जर्मनीला मागं टाकून तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो, असं म्हटंलय. देशात 5G ला सुरुवात होण्यास 22 महिने लागले. जे जगातील सर्वात जलद आहे. सरकार 6G तंत्रज्ञानाचा प्रचार करत आहे जेणेकरून वापरकर्त्यांना 100Mbps डेटा स्पीड मिळेल.
6G विकसित करण्यास सुरवात
भारतानं 6G विकसित करण्याच्या दिशेनं पावलं टाकण्यात सुरवात केलीय. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मते, भारत 2027 पर्यंत जपान आणि जर्मनीला मागे टाकून तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो. अशा परिस्थितीत, देशाला डिजिटलदृष्ट्या खूप मजबूत आणि प्रगत होण्याची आवश्यकता आहे. त्यांनी या दिशेनं जलद पावलं उचलली असल्याचं म्हटलं आहे.
22 महिन्यांत 5जी रोलआउट
भारतानं विक्रमी 22 महिन्यांत 5जी रोलआउट केलं आहे, जे संपूर्ण जगात सर्वात जलद आहे. मंत्र्यांनी दावा केला की 5जी कनेक्टिव्हिटी देशाच्या सुमारे 99 टक्के क्षेत्रापर्यंत पोहोचली आहे. ते म्हणाले की सरकार 6जी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देत आहे. 6जी तंत्रज्ञानाच्या मदतीनं वापरकर्त्याला 100 एमबीपीएस डेटा स्पीड मिळू शकतो, जो सध्या सुमारे 20 एमबीपीएस आहे. अशा परिस्थितीत इंटरनेट स्पीड 5 पट वेगवान होणार आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या मते, सुमारे 10 वर्षांपूर्वी, भारतात इंटरनेट स्पीड 1.5 एमबीपीएस होता. सिंधिया म्हणाले की 2028 पर्यंत देश 5 ट्रिलियन डॉलर्सचा आकडा गाठेल आणि 2030 पर्यंत सुमारे 6 ट्रिलियन डॉलर्सचं लक्ष्य गाठता येईल.
डिजिटल पेमेंट वेगानं वाढलं
"सध्या भारतात 46 टक्क्यांहून अधिक व्यवहार डिजिटल पद्धतीनं केले जात आहेत. त्यांची संख्या सुमारे 170 लाख कोटी आहे. पंतप्रधान मोदींना देशाला सेवा राष्ट्र म्हणून नव्हे, तर उत्पादन राष्ट्र म्हणून ओळखलं जायला हवं, असं म्हटलंय. म्हणूनच स्वदेशी उत्पादनांवर भर दिला जात आहे. बीएसएनएलकडून स्वदेशी 4जी सेवा विकसित केली जात आहे".
स्वदेशी 4जी स्टॅक 18 महिन्यांत तयार
"सरकारी कंपनी सी-डॉट ही खाजगी क्षेत्रातील कंपनी तेजस नेटवर्कसोबत सहकार्यानं काम करत आहे. सी-डॉटचं काम कोर विकसित करणं आहे. तेजस रेडिओ अॅक्सेस नेटवर्क विकसित करतेय. पुढील 18 महिन्यांत एचएस इंडिया स्वतःचा 4जी स्टॅक तयार करेल. असं करणारा भारत जगातील चौथा देश असेल", असं सिंधिया म्हणाले.
हे वाचलंत का :