मुंबई : बॉलिवूडमधील असे काही प्रसिद्ध जोडपे आहेत, ज्यांना चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रेम झालं आणि त्यांनी लग्न देखील केलं. असे अनेक सेलिब्रिटी जोडपे आहेत, जे खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे साथ देत आहेत. रीलमध्येच नव्हे तर प्रत्यक्षातही जोडपी बनल्यानंतर आजही ते चर्चेत येत असतात. अशा सेलिब्रिटी जोडप्यांची प्रेमकथा आज आम्ही व्हॅलेंटाईन डेच्या निमित्त सांगणार आहोत.
1 दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग : बी-टाऊनमधील सर्वात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची भेट संजय लीला भन्साळी यांच्या 'गोलियों की रासलीला: रामलीला' (2013) च्या सेटवर झाली. शूटिंग दरम्यान ते एकमेकांच्या जवळ आले. दोघांमधील मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनीही त्यांचं वैयक्तिक नाते गुप्त ठेवलं, असलं तरी, चित्रपटानंतर त्यांनी डेटिंग सुरू केल्याची अफवा पसरली होती. या जोडप्यानं पाच वर्षांच्या नात्यानंतर आणि चार हिट चित्रपट दिल्यावर 14 आणि 15 नोव्हेंबर 2018 रोजी इटलीतील लेक कोमो येथे लग्न केलं. आता या जोडप्याला एक छोटी मुलगी आहे.
2 आलिया भट्ट आणि रणबीर कपूर : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर संजय लीला भन्साळी यांच्या 'ब्लॅक' चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता, त्यावेळी ऑडिशनसाठी आलेल्या 11 वर्षीय आलिया भट्टला रणबीरवर क्रश निर्माण झाला होता. यानंतर अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आलिया रणबीरच्या प्रेमात पडली. 14 एप्रिल 2022 रोजी या जोडप्यानं लग्न केलं. या जोडप्याला राहा नावाची एक मुलगी देखील आहे.
3 करीना कपूर-सैफ अली : अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान ही जोडी देखील पॉवरपॅक कपलपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांत या जोडप्यानं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. करिना आणि सैफ यांच्यातील प्रेमाची ठिणगी पहिल्यांदा 'टशन' चित्रपटाच्या सेटवर उफाळून आली. सैफ हा करीनापेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. या जोडप्याचं लग्न 16 ऑक्टोबर 2012 रोजी झालं. या जोडप्याला तैमूर आणि जहांगीर ही दोन मुले आहेत.
4 ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचं नाव अनेकदा सलमान खान आणि विवेक ओबेरॉयशी जोडलं जात होतं. मात्र 2007 मध्ये ऐश्वर्याचं नशीब बदललं. तिनं 'मणिरत्नम'च्या 'गुरु' चित्रपटात काम केलं. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनी 'रावण', 'धूम 2', 'कुछ ना कहो' आणि 'सरकार' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. एका मुलाखतीत अभिषेकनं खुलासा केला होता की त्यानं, 'उमराव जान' दरम्यान ऐश्वर्याला प्रपोज केलं होतं, त्यानंतर त्यांनी मुंबईतील प्रतिक्षा निवासस्थानी लग्न केलं.
5 कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा : कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा हे बी-टाउनमधील हॉट कपलपैकी एक आहेत. दोघांची भेट 'शेरशाह' (2021) च्या सेटवर झाली आणि एकत्र काम केल्यानंतर लगेचच त्यांनी डेटिंग सुरू केली. या जोडीचा पहिला आणि आतापर्यंतच्या एकमेव ऑन-स्क्रीन प्रोजेक्ट आहे. दोघांनीही त्यांचे नाते खाजगी ठेवले. सुमारे दीड वर्ष डेटिंग केल्यानंतर, त्यांनी 7 फेब्रुवारी 2023 रोजी लग्न केलं.
6 जेनेलिया देशमुख-रितेश देशमुख : अभिनेत्री जेनेलिया देशमुख आणि रितेश देशमुख हे बॉलिवूडमधील सर्वात गोंडस जोडप्यांपैकी एक आहेत. हे जोडपे पहिल्या चित्रपट 'तुझे मेरी कसम' (2003) च्या शूटिंग दरम्यान भेटले होते. यानंतर त्यांच्या डेटिंग अफवा सुरू झाल्या होत्या. डेटिंगच्या नऊ वर्षांनंतर, 3 फेब्रुवारी 2012 रोजी, या जोडप्यानं लग्न केलं. या दोघांचं पहिले पारंपारिक मराठी पद्धतीनं विवाह केला. यानंतर त्यांनी ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केलं. या जोडप्याला दोन मुले आहेत.
7 अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना : अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांची पहिली भेट फिल्मफेअर फोटोशूट दरम्यान झाली होती, मात्र दोघांमधील प्रेमाची ठिणगी 'इंटरनॅशनल खिलाडी' (1999) च्या सेटवर उडाली. हे दोघेही एकत्र पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसले. या जोडप्यानं 2001मध्ये लग्न केलं. यांना एक मुलगा आहे.