ETV Bharat / state

हरवलेला लहान भाऊ अखेर सापडला; गहिवरून आलेल्या मोठ्या भावानं ईटीव्ही भारतचे मानले आभार - MISSING BROTHER SEARCH NAGPUR

आश्राप्पा बेदरे यांचा भाऊ गेल्या वर्षी २९ ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाला होता. तो ईटीव्ही भारतच्या बातमीमुळं सापडला आहे.

Ashrappa Bendre
आश्राप्पा बेदरे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 15, 2025, 11:02 PM IST

नागपूर : आश्राप्पा बेदरे. वय वर्ष ६२. जणू पायाला भिंगरी लावल्यागत ते नागपूर शहरातील कानाकोपऱ्यात आपल्या लहान भावाचा शोध घेत होते. आश्राप्पा बेदरे यांचा भाऊ गेल्यावर्षी २९ ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाला होता. बेदरे हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील रहिवासी आहेत. मात्र, भावाचा शोध घेण्यासाठी गेल्या साडेतीन महिन्यांपासून ते तहान-भूक विसरून वणवण भटकत होते. अखेर ईटीव्ही भारतच्या बातमीमुळं त्यांना यश आलं आहे.

ईटीव्ही भारतने जबाबदारी स्वीकारली आणि बातमी केली. त्यामुळं आज माझा भाऊ सापडला. त्यामुळं 'ईटीव्ही भारत'चा खूप आभार आहे. हा कधीही न विसरणारा प्रसंग आहे. 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी मला वेळ दिली आणि खूप मदत केली, असं म्हणत आश्राप्पा बेदरे यांनी 'ईटीव्ही भारत'चे आभार मानले.

प्रतिक्रिया देताना आश्राप्पा बेदरे (ETV Bharat Reporter)

काय आहे घटना? : ओंकार बेदरे असं त्यांच्या हरवलेल्या भावाचं नाव आहे. गेल्या काही वर्षांपासून आश्राप्पा यांच्या मोठ्या मुलावर आणि लहान भावावर नागपुरात उपचार सुरू होते. त्या दोघांना घरी घेऊन जाण्यास डॉक्टरांनी परवानगी दिल्यामुळं आश्रप्पा नागपुरात आले. २९ ऑक्टोबरला मनोरुग्णालयातून सुट्टी मिळाल्यामुळं ते ओंकारला आणि त्यांच्या मुलाला घेऊन बुलढाण्याला जाणार होते. सीताबर्डीत ऑटो रिक्षातून उतरल्यानंतर भावाचा हात धरून ते पोलीस ठाण्यासमोरून जात होते. यावेळी दिवाळीच्या खरेदीसाठी सीताबर्डीत प्रचंड गर्दी उसळली होती. या गर्दीत गाडी बघत असताना काही क्षणासाठी आश्रप्पांच्या हातातून ओंकारचा हात सुटला अन् घात झाला. त्यांनी आसपास विचारपूस केली. मात्र, त्याचा पत्ता लागलाच नाही. त्यानंतर त्यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, यावेळी सीसीटीव्हीत गर्दीमुळं काहीच लक्षात येत नसल्याचं सांगून पोलिसांनी त्यांची बोळवण केली. त्यानंतर आश्राप्पा यांनी स्वत:च आपल्या भावाचा शोध सुरू केला.

प्रत्येक पिढीतील एक सदस्य होतो मनोविकारग्रस्त : आश्राप्पा बेदरे यांच्या कुटुंबाची निराळी व्यथा आहे. बेदरे कुटुंबाच्या प्रत्येक पिढीतील एक तरी सदस्य हा मनोविकारांनी ग्रस्त असतो. सुरुवातीला आश्राप्पा यांची आई मनोविकारग्रस्त झाली. त्यानंतर त्यांचा भाऊ ओंकार आणि आश्राप्पा यांचा मोठा मुलगा देखील मनोविकारग्रस्त झाला. थोडक्यात काय. तर नियतीनं सर्व बाजूंनी कोंडी केली आहे. पण आश्राप्पा बेदरे हे सक्षमपणे आपल्या लहान भावाचा शोध घेत आहेत. आपल्याला पोलीस प्रशासनाची अधिक मदत मिळाली तर आपण भावापर्यंत पोहोचू शकू, अशी भावना त्यांनी व्यक्त केलीय. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडंही त्यांनी आपल्या भावाला शोधून देण्याची मागणी केलीय. आश्राप्पा यांचा भाऊ वयाच्या पन्नाशीच्या आसपास असला तरी मनोविकारग्रस्त असल्यामुळे त्याला स्वतःच्या घरचा पत्ता सांगता येत नाही. आपल्यापुरता विचार करणाऱ्या लोकांच्या गर्दीत आपल्या मदतीला एकतरी चांगल्या वृत्तीचा माणूस येईल, या आशेवर आश्राप्पा यांनी भावाचा शोध सुरु ठेवला आहे.

हेही वाचा -

डोळ्यात अश्रू, घशात हुंदका अन् भटकंती! हरवलेल्या लहान भावाला शोधण्यासाठी मोठा भाऊ फिरतोय वणवण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.